नांदेड : -गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजुरसाहेब गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी नुक्तीच जत्थेदार पदावर पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. याप्रसंगी नांदेड मध्ये भव्य स्वरुपात सेवपूर्तिचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. याचे स्मरण म्हणून संतबाबा कुलवंतसिंघजी यांचे शालेय मित्रपरिवारातर्फे मंगळवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी श्री गुरु ग्रंथसाहेबजी भवन येथे भव्य असे सत्कार करण्यात आले. यावेळी स. जसपालसिंघ तबेलेवाले, स. रचपलसिंघ शाहू, स. जसवंतसिंघ शाहू, स. अमरजीतसिंघ पटवारी, स. किरपालसिंघ हजुरिया, स. दीपकसिंघ गल्लीवाले, स. दर्शनसिंघ तबेलेवाले, स. दीपसिंघ बंड, स. कश्मीरसिंघ हंडी, स. रघुबीरसिंघ शाहू, स. जसपालसिंघ बसरीवाले, स. रघुबीरसिंघ बाऊडीवाले, स. गुरबचनसिंघ बंड, स. बिरेंदरसिंघ बुंगाई, स. गोबिंदसिंघ सिद्धू, स. जसपालसिंघ लांगरी, स. राजेंद्रसिंघ बासरीवाले, स. दुर्लभसिंघ बुंगाई, श्री श्रवणकुमार वाधवानी, स. जितेंदरसिंघ संत, स. लक्षमनसिंघ भोसीवाले, स. अमरजीतसिंघ सिद्धू, स. रविंदरसिंघ लांगरी, कुलदीपकौर लिखारी, हरमिंदरकौर गल्लीवाले, सुदाम नंदिनी, स. सुखवंतकौर धारीवाल, करतारकौर संधू, पलविंदरकौर लिखारी, प्रकाशकौर फौजी, रविंदरकौर, गोबिंदाकौर रागी, दलजीतकौर तोपची, पवनजीतकौर, प्रकाशकौर आदींची उपस्थिती होती. संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी सर्वांचे आभार मानले.
संतबाबा कुलवंतसिंघ यांचा वर्गमित्रांकडून सत्कार!

Leave a Reply