नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या निवास व शिक्षणासाठी असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा शासन नियमाप्रमाणे चालत नसल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी हडप केला जात आहे. त्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे आणि संबंधीत शाळांचा संस्थाचालक यांची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज रामराव कांबळे आणि दिपक कसबे यांनी प्रादेशिक उपसंचालक लातूर यांच्याकडे केली आहे.
पंकज कांबळे आणि दिपक कसबे यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये जिनीयस पब्लिक स्कुल आनंदनगर नांदेड, शंकरराव चव्हाण इंटरनॅशनल स्कुल ऍन्ड ज्युनियर कॉलेज दत्तनगर नांदेड तसेच राजश्री पब्लिक स्कुल आंबेडकर चौक वसरणी या तिन शाळांमध्ये इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विकासाच्या नियमाप्रमाणे कामे होत नाहीत. त्यातील धोरणाप्रमाणे शैक्षणिक संकुल इमारत आणि वस्तीगृह इमारत दोन वेगळ्या आहेत. विहित आकारनाम्याप्रमाणे जिल्हा स्तरीय शाळांसाठी दोन एकर क्षेत्र हवे आहे. नगर परिषद स्तरावरील शाळांसाठी 3 एकर क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रासाठी 4 एकर क्षेत्र असावे. या शाळांकडे या पध्दतीने जागा उपलब्ध नाही. याची चौकशी व्हावी . या शाळांची तिमाही, सहामाही व वार्षिक तपासणी करतांना शिवानंद मिनगिरे यांनी संस्था चालकांच्या सांगण्याप्रमाणे अहवाल तयार केले आहेत. शाळांमध्ये धनगर समाजाच्या बालकांची बोगस संख्या दाखविण्यात आली आहे. तरी या शाळांची चौकशी करतांना चौकशी सोबत सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांचीही चौकशी व्हावी असे अर्जात लिहिले आहे. या अर्जाच्या प्रति इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव, संचालक आणि उपसचिव दिनेश चव्हाण यांना दिल्या आहेत आणि आ.जयंत पाटील यांना या अर्जाची प्रत पाठवून विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची मागणी केली आहे. या अर्जानुसार प्रादेशिक उपचासंचालक दि.व.राठोड यांनी पंकज कांबळे आणि दिपक कसबे यांना दिलेल्या पत्रानुसार तिन शाळांच्या तपासणीसाठी लेखाधिकारी मनोज सकट यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्यात सहाय्यक लेखाधिकारी श्रीप्रसाद बुरसे हे सदस्य आहेत आणि या समितीचे सदस्य सचिव कार्यालय अधिक्षक एस.बी.नटवे हे आहेत.
नांदेड येथील तीन शाळांमधील गैरकृत्य तपासणीसाठी समितीची स्थापना

Leave a Reply