5 फेबु्रवारी 2025 हा दिवस भारतीय ईतिहासात अत्यंत लाजिरवाणा दिवस म्हणून ईतिहासात लिहिला जायला हवा. अमेरिकेचे एक सैन्य विमान गुपचूपपणे अमृतसर विमानतळावर उतरले आणि त्यातून 104 भारतीयांना बेड्या घातलेल्या अवस्थेत खाली उतरून घेण्यात आले. सरकारच्या चुकांना उघड करण्याची जबाबदारी असलेल्या पत्रकारांनी मात्र याची सारवा सारव केली. त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किती तंत्र शुध्दपणे त्रिवेणी संगमात डुबकी मारत आहेत हे दाखविण्यात धन्यता होती. एक अँकर तर असे म्हणत होता की, कॅमेऱ्याला हवा त्या एँगलमध्ये उभे राहुन पंतप्रधानांनी बिना नाक बंद करता मारलेली डुबकी अभुतपुर्व आहे. पण ज्यांनी त्या डुबकीची चित्रे पाहयली असतील तर ती डुबकी अर्धवटच होती. कोलंबिया आणि मॅक्सीको या दोन देशाच्या राष्ट्रपतीने दाखवलेली हिम्मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवता आली नाही. बहुदा पुढील आठवड्यात त्यांना अमेरिकेचे निमंत्रण येणार आहे म्हणून असे घडले असेल. भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंघ आज असले असते तर मिडीयाने अमेरिकेचे सैन्य विमान हवेत असल्यापासून त्याची लाईव्ह फुटेल भारतातील नागरीकांना दाखवून भारत सरकार किती चुकीचे वागत आहे हे दाखवले असते.
अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोल्नॉड ट्रम्प यांनी आपल्या प्रचारात सुध्दा अवैध प्रवाशांना मी काढून टाकेल असे जाहीर केले होते. आणि शपथ घेताच त्यांनी त्याची सुरूवात पण केली. भारत एकटाच नव्हे तर अनेक देशांचे अवैध प्रवाशी ट्रम्प परत पाठवत आहेत. अमेरिकेचे सैन्य विमान एखाद्या देशात उतरणे हे भिती पसरविण्याचे काम आहे. या सैन्य विमानात 104 भारतीयांना परत पाठविण्यात आले. त्यांच्या हातात आणि पायात बेड्या होत्या. त्यात गुजरात 33, हरियाना 33, पंजाब 33, उत्तरप्रदेश 3 महाराष्ट्र 3 चंदीगड 2 असे प्रवाशी आहेत. यामध्ये एकूण 69 पुरूष, 25 महिला, 12 अल्पवयीन बालके ज्यामध्ये सर्वात लहान 4 वर्षाचा गुजरात येथील बालक आहे. या सैन्य विमानात 12 विमान कर्मचारी आणि 45 अमेरिकन सैन्याचे अधिकारी होते. प्रशासनाने या बाबत दक्षता घेत मिडीयाला आत जाऊच दिले नाही. का असे व्हावे. पंतप्रधान नरेंद्र मेादी असल्यामुळेच हे घडले. नसता दुसरा पंतप्रधान असला असता तर मिडीयाने अमेरिकेचे सैन्य विमान हवेत असतांनापासून लाईव्ह फुटेज प्रसारीत करून सरकारला धारेवर धरले असते.

यापुर्वी सन 2013 मध्ये देवयानी खोब्रागडे या भारतीय महिला अधिकाऱ्याला बेड्या टाकून अत्यंत अपमान होईल अशी त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंघ यांनी अत्यंत कडक शब्दात निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी भारताच्या विदेश सचिव सुजातासिंह यांनी अमेरिका सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. भारत सरकारने अमेरिकन राजदुतावासाला दिल्या जाणाऱ्या अनेक सुविधा त्वरीत बंद केल्या होत्या. तत्कालीन लोकसभेचे अध्यक्ष मिरा कुमार, गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे आणि खा. राहुल गांधी यांनी त्यावेळी भारतात आलेल्या अमेरिकन कॉंगे्रसच्या शिष्टमंडळाला भेट नाकारली होती आणि सर्वांचा परिणाम असा झाला होता की, अमेरिकेने भारताच्या विदेश सचिव सुजातासिंह यांना फोन करून झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करुन प्रकरण समाप्त केले होते. त्यावेळी पत्रकारांनी सुध्दा आप-आपल्या शब्दात अमेरिकेची वाट लावली होती आणि सरकारला धारेवर धरुन अमेरिकेविरुध्द कार्यवाही करण्यास भाग पाडले होते.
का बेड्या ठोकल्या अवैध प्रवाशांना ते काय आपतकालीन दार उघडणार होते. पण निर्णय ट्रम्प सरकारचा मात्र याला सुध्दा कोलंबिया आणि मॅक्सीकोच्या राष्ट्रपतींनी जबर उत्तर दिले. त्यांनी अमेरिकेचे सैन्य विमानत आपल्या देशात उतरूच दिले नाही. त्यांनी सांगितले की, आमचे प्रतिनिधी मंडळी येईल. तुम्ही पाठवत असलेली मंडळी ही आमच्या देशाचे नागरीक आहेत काय याची तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर आम्ही त्यांना स्वत:च्या नागरी विमानाने घेवून जाऊ. कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी तर आपले विमान पाठविल्यानंतर नागरीकांचे स्वागत पण केले. त्यांच्या मते अवैध प्रवाशी हे गुन्हेगार नसतात. त्यांच्यासोबत बेड्या टाकण्याचा प्रकार हा त्यांचे अवमुल्यन करण्याचा प्रकार आहे. त्यांना आपले जीवन जगण्याचा अधिकार आहे. असाच काहीसा प्रकार भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का करता आला नाही. सर्वाधिक अवैध प्रवाशी गुजरातचे आहेत. कमीत कमी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी तरी त्यांचे स्वागत करायला हवे होते. पण असे घडले नाही. कारण पुढच्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका बोलावणार आहे असे वृत्त व्हाईट हाऊसने प्रसारीत केले आहे.
भारतीय पत्रकार आता बातम्यांच्या महत्वाला विसरले आहेत. भारताचे नागरीक अवैध प्रवाशी असतील परंतू त्यांना हातात, पायात आणि कंबरेला बेड्या टाकून पाठविण्याची पध्दत अमानवीय आहे. या बातमीला स्थान न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिवेणी संगमावर डुबकी मारत असलेल्या लाईव्ह कव्हरेजला महत्व देण्यात आले. दळभद्री पत्रकारांना बातमीचे महत्व कळणे सुध्दा समाप्त झाले आहे. ट्रम्पनेच अवैध प्रवाशी परत पाठवले असे नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जो बायडन यांनी सुध्दा 1000 अवैध प्रवाशी परत पाठविले होते. पण या बातमीला सुध्दा पत्रकारांनी प्रसारीत केले नव्हते. कारण ती आपली बेईज्जती आहे. पण सरकार स्वत: गप्प बसले आणि पत्रकार त्या घटनांना महत्व देत नाहीत. म्हणून आज जग तुम्ही विक्री झालेले आहात असे म्हणत असेल तर त्यांचे काय चुकले. या संदर्भाने 50 च्या दशकात सुध्दा प्रसिध्द साहित्यकार, लेखक आणि पत्रकार स.आदत हसन मंटो यांनी सुध्दा विक्री झालेला पत्रकार आणि वेश्या एकाच श्रेणीत येतात असा उल्लेख केलेला आहे. 50 च्या दशकात आजची परिस्थिती हसन मंटो यांना कशी कळली असेल. त्यांच्या त्या विचार शक्तीला मानाचा मुजरा.
धर्म आणि देश हे दोन वेगळे विषय आहेत. धर्म प्रत्येकाला प्रिय आहे आणि असावाही आम्हाला त्यावर आक्षेप घेण्याचा हक्क नाही. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी धार्मिक कार्यक्रमाला जातात आणि गुपचूप पणे अमेरिकन सैन्य विमान अमृतसरमध्ये उतरते याबाबीला लपविण्यासाठी धार्मिक बातम्यांना पत्रकारांनी महत्व दिले असेल तर आम्ही त्याचे समर्थन करणार नाही. यानंतर सुध्दा कोणी आमच्या बद्दल आम्ही देशाशी बेईमानी करतो आहोत असे आमच्या बद्दल म्हणेल तर आम्ही इतरांना खुश करण्यासाठी पत्रकारीता स्विकारलेली नाही तर सत्य लिहुन लपलेल्या गोष्टी वाचकांसमोर आणण्यासाठी आम्ही पत्रकारीता स्विकारलेली आहे. कोणाला काय आमच्या बद्दल बोलायचे ते जरुर बोला त्यामुळे आमच्या जीवनावर, आमच्या वागण्यावर, आमच्या लिखाणावर काही परिणाम होणार नाही.
Leave a Reply