राष्ट्रीय शीख शिकलीगर संघटनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर


अध्यक्षपदी लाभसिंघ घटाडे तर उपाध्यक्ष बलजीतसिंघ बावरी 

नांदेड- शीख शिकलीगर समाजाची एकमेव संघटना असलेल्या राष्ट्रीय सिक सिकलीगर संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची निवड जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदी पंजाब येथील लाभसिंग घटाडे राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बलजीतसिंघ बावरी तर सचिवपदी ठाकूरसिंघ बावरी यांच्यासह कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

देशभरातील सिख सिखलीकर समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व रोजगाराच्या समस्यांची सोडवण्यासाठी व समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देशभरामध्ये राष्ट्रीय सिख सिखलीगर संघटना ही एकमेव संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक सचखंड हुजूर साहिब येथील अरुणा वैकुंठधाम माहेश्वरी कौठा येथे बलजीतसिंघ बावरी यांनी दि. 30 व 31 डिसेंबर रोजी आयोजित केली होती. यापूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणीची 2017 मध्ये भोपाळ 2024 ऋषिकेश येथे बैठक झाली होती या बैठकीला देशभरातील विविध राज्यातून शिकलीकर समाजाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी एकमताने राष्ट्रीय कार्यकारणी निवड करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्षपदी पंजाब येथील लाभसिंघ घटाडे, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बलजीतसिंघ बावरी महाराष्ट्र, राष्ट्रीय कोषाध्यक्ष भिकमसिंघ बावरी हरियाणा, सचिव ठाकुरसिंघ बावरी, हरदेवसिंघ बावरी तेलंगाना, सहसचिव परनसिंघ थिल्यापतिया राजस्थान, राष्ट्रीय संघटक बाबा प्रमाणसिंघ हरियाणा, राष्ट्रीय प्रवक्ता दारासिंघ घटाडा महाराष्ट्र यांच्यासह स बुधासिंग भोंड उत्तर प्रदेश, अमरदीपसिंग टाक कर्नाटक, मानसिंग डांगी गुजरात, रूपसिंघ पटवा मध्यप्रदेश, महेंद्रसिंघ बावरी गुजरात,दिपसिंघ टाक कर्नाटक, त्रिलोकसिंग बावरी मध्यप्रदेश, भिमसिंघ जुनी राजस्थान, अशोकसिंघ हरियाणा, पातकौर भादा महाराष्ट्र, जितसिंघ टाक पंजाब, पप्पूसिंघ जुनी दिल्ली, गुंडासिंग थिलपितिया तेलंगाना, तर सदस्य जगतसिंघ टाक, बिरसिंघ मध्यप्रदेश, मलकितसिंघ उत्तरप्रदेश, राजूसिंघ हरियाणा, धरमसिंघ खिची यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निवडीमुळे शीख शिकलीगर समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Post Views: 97






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *