धर्म एकच पण आमचे स्नान आणि त्यांचे स्नान… – VastavNEWSLive.com


 

सनातन धर्म की जय! अशी घोषणा भर विधानसभेत देणारे देवेंद्रजी फडणवीस त्याच विचाराचे नितीनजी गडकरी, मोहनजी भागवत,…. हे अलख निरंजन, अलख निरंजन! असा जप करत गळ्यात कवट्या अडकवून, चिलीमीचा धूर सोडत, नंतर एका हाताने नाक दाबत डुबकी मारताना युट्युब वर मला तरी दिसले नाहीत. आम्हा हिंदू प्रमाणे त्यांच्याकडून काहीच पाप झाले नाही का? अमृत कणांची त्यांना गरज नाही का?

तसेतर वयाच्या सहाव्या वर्षी मीही डुबकी मारली होती. चंद्र भागेत . वारीत पंढरपूरला. जेव्हापासून वर्तमानपत्र वाचायला लागलो तेव्हापासून एखाद्या राजकारणी नेत्याने विधानसभेत ‘सनातनी धर्माचा विजय असो ‘ अशी घोषणा दिल्याचे वाचले, ऐकले नव्हते. ती आमच्या देवा भाऊंनी दिली. तेव्हा पासून सनातन धर्म समजून घ्यायला सुरुवात केली. शाळेच्या पटावर तसा आम्हा सगळ्यांचा धर्म हिंदूच आहे. पण सनातनी म्हणवून घेणाऱ्यांची डुबकी व आमची डुबकी यात केवढ अंतर! आजही मी वारीत सामील होतो. तिथे ही हौसे ,गौसे ,नवसे असतात .पण फार अल्प. तिथं अलख निरंजन ऐवजी राम कृष्ण हरी म्हणतो. तिथं कोणी एका पायावर उभा राहत नाही. वस्त्र फेकून देऊन सामील होत नाही. कुणी नखं वाढवलेलं जटा वाढवलेलं नसतं. चिलीम मध्ये गांजा भरून हवेत धूर सोडत नसतं. तिथे सगळे समान सारखे असतात. टाळ मृदुंगाचा गजर असतो. असलास तर फुगडी व कमरेवर हात देऊन नाच असतो. नखशिकांत कपडे असतात. तिथं कोणी जात धर्म विचारत नाही. लहान थोर एकमेकांच्या पाया पडतात. मोहन भागवत व मंडळींचा सनातन धर्म असा का असतो बरे?

आमचे धर्मग्रंथ अभ्यासले तेव्हा साक्षात्कार झाला की,नितीन, देवेंद्र, मोहन,…, वगैरे मंडळींनी पाप केले ,नाही केले, तरी त्यांना डुबकी मारून पाप धुवायची गरज नाही. कारण आमच्या धर्मात ब्राह्मण कितीही भ्रष्ट असला तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असतो व मृत्यूनंतर त्याची जागा कायम ज्या गृहगोलात महर्षी राहतात म्हणजे स्वर्गातच असते. मग डुबकी कशाला मारा?

एकदम स्वर्गाचीच गॅरंटी! (भ.गीता अध्याय 14 ओवी 14) धर्मग्रंथांच्या बळावर निव्वळ चिलीम मधला नव्हे तर ऐहिक ,पारलौकिक पातळीवर त्यांना धूरच धूर काढता येतो. कुठेही व कितीही डुबक्या मारल्या तरी क्षत्रिय यांची मृत्यूनंतर जागा माणूस राहतो त्या भूतलावर व शूद्रांची जागा पशु योनित म्हणजेच नरकातच असते(भ.गीता अध्याय 14 ओवी 15).असे असताना गळ्यात खोपडी अडकवलेल्या नग्न, अर्ध नग्न नर नारींना, सनातनी म्हणून स्वतःला भूतलावरील देव मानणारे देवेंद्र व मंडळी हे आपलेच म्हणून का स्वीकारतात?काय हेतू/कावा असतो त्यामागे? ते पाहूया यथावकाश .

-सुरेश खोपडे


Post Views: 28






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *