नांदेड(प्रतिनिधी)- देगलूर येथे शासनाची मान्यता नसतांना नर्सिंग कॉलेज चालवून विद्यार्थ्यांकडून फिस घेवून त्यांना शासनाच्या पावत्या देणाऱ्याविरुध्द देगलूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
देगलूर येथील विद्यार्थीनी पल्लवी रमानंद धुताळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 सप्टेंबर 2022 पासून ते आजपर्यंतच्या दरम्यान समृध्दी कॉलेज ऑफ नर्सिंग पॅरामेडिकल सायन्स (जीएनएम) जनरल नर्सिंग मिड वायफरी देगलूर येथे शंकर गणपतराव बाबरे(32) रा.बोरगाव ता.देगलूर यांनी आपल्या प्राचार्य पदाचा दुरुपयोग करून महाराष्ट्र शासनाकडून किंवा कोणत्याही दुसऱ्या विभागाकडून नोंदणी, परवानगी न घेता कॉलेज शासन मान्य असल्याचे दाखवून बनावटी व खोटे शैक्षणिक बोर्ड, पावत्या, पुस्तके, खरी असल्याचे दाखवून विद्यार्थ्यांना विश्र्वासात घेवून जनरल नर्सिंग या अभ्यास क्रमासाठी प्रवेश दिला. माझ्याकडून 40 हजार रुपये घेतले आणि माझी आर्थिक व शैक्षणिक फसवणूक केली आहे. देगलूर पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 59/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक फड यांच्याकडे देण्यात आला आहे.
Post Views: 129
Leave a Reply