नांदेड(प्रतिनिधी)-दि.03 रोजी दुपारी 1.45 वाजता अर्धापूर बायपास येथे ट्रक कंटेनरला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभाग कंट्रोल रूमला मिळाली तात्काळ एक फायर वाहन कर्मचाऱ्यासहित घटनास्थळाकडे रवाना झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुरुवातीला आग ही कंटेनरच्या केबिनला लागली होती. केबिनची पूर्ण आग होजरील होजच्या साह्याने विजवण्यात आली. नंतर पाहणी केली असता कंटेनर केबिनच्या मागच्या बाजूस आत मधील ट्रान्सपोर्ट साहित्यांना आग लागल्याचे निदर्शनास आले. कंटेनर मधील सर्व वस्तूं बाहेर काढत काढत आग विझवण्याचे कार्य चालू ठेवले. सदरील कंटेनर क्रमांक MH 42 AQ 5989 हा New Shree Bombay Transport Carriers चा होता व तो Dp world logistic या ट्रान्सपोर्ट चा माल इंदोर ते बेंगलोर सप्लाय करणार होता. यामध्ये बुलेट गाडी, इन्व्हर्टर बॅटरी, इलेक्ट्रिक स्कुटी टायर 15, साड्या बॉक्स, नाईट पॅन्ट बॉक्सेस, टी-शर्ट बॉक्सेस, शूज बॉक्सेस, बॅनर पेपर, पेंटिंग बोर्ड, क्रीम बिस्कीट पॅकेट, बेडशीट, चादर व इतर साहित्य होते ऊक्त आगी वरती दोन फायर गाड्या पाणी मारून आग पूर्णपणे विजवण्यात आली. आग कशामुळे लागली हे कंटेनर वाहन चालकाला विचारले असता कॅबीन मधील वायरिंगची शॉट सर्किट झाली होती व तेथून प्रथम आग लागल्याची प्राथमिक माहिती वाहन चालकाने दिली. अंदाजे नुकसान सध्या सांगता येत नसल्याचे सांगितले.
सदरील आगी वरती अग्निशमन अधिकारी के.एस.दासरे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, कदम, किरकन यांनी कार्य केले.
Leave a Reply