“2024 च्या निवडणुकीत भाजप 418 चा आकडा कसाबसा गाठेल”

मुंबई | औरंगाबादमध्ये राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अधिवेशनात वास्तुशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्राचे अभ्यासक सहभागी झाले होते.
अधिवेशनात उपस्थित वेदमूर्ती अनंत पांडव यांनी देशातील तसेच महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचंही भविष्य वर्तवलं. एका वृत्तवाहिनीला त्यांनी दिलेल्या मुलाखतीतून महत्त्वाच्या नेत्यांचं भविष्य सांगण्यात आलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपातर्फे जोरदार तयारी केली जात आहे. मात्र येत्या काळात भाजपाला अनेक विरोधक तयार होतील. 2024 मध्ये दहशतवाद आणि राष्ट्रवादाचा मुद्दा देशात गाजेल. भाजप 418 चा आकडा कसाबसा गाठेल, असं भविष्य अनंत पांडव यांनी वर्तवलं आहे.
दरम्यान, येत्या जानेवारीनंतर उद्धव ठाकरेंचं ग्रहमान बदलेल आणि त्यांचं पारडं जड होईल, अशी भविष्यवाणी औरंगाबाद येथील प्रसिद्ध ज्योतिषी, कुंडली अभ्यासक वेदमूर्ती अनंत पांडव (Anant Pandav) यांनी म्हटलं आहे.
हे भविष्य जास्त महत्त्वाचं आहे. कारण महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची मुख्य सुनावणी जानेवारी महिन्यात होत आहे. यानंतरच्या काळात उद्धव ठाकरेंचं पारडं जड असेल, असं भवितव्य वेदमूर्तींनी वर्तवलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-