The Kerala Story :‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन रुग्णालयात दाखल, या कारणामुळे बिघडली तब्येत – Marathi News | The Kerala Story director, Sudipto Sen, admitted to hospital due to ill health

मनोरंजन



एकीकडे ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची घोडदौड सुरू असतानाच या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशाने चित्रपटाची स्टारकास्ट आणि निर्मात्यांना आनंद झाला आहे. सर्व वादानंतरही या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. दिग्दर्शक सुदीप्तो सेन (sudipto sen) यांच्या या चित्रपटाने 20 दिवसांत 200 कोटींची कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मात्र या सर्वादरम्यान एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना रुग्णालयात दाखल (admitted in hospital) करावे लागले.

एका रिपोर्टनुसार, सततच्या प्रवासामुळे सुदीप्तो सेन आजारी पडले आहेत, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे इतर शहरातील प्रमोशन थांबवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुदीप्तो सेन यांची तब्येत बरी झाल्यानंतर ते10 शहरांमध्ये ‘द केरळ स्टोरी’चा प्रचार करण्याची योजना आखत आहेत. पण सततच्या प्रवासामुळे आता त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत आहे.

दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचे कामाचे वेळापत्रक खूपच व्यस्त झाले आहे असे समजते. ते वेगवेगळ्या जागी, अनेक शहरांत जाऊन लोकांशी त्यांच्या चित्रपटाविषयी बोलत आहेत आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरेही देत ​​आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच सुदीप्तो सेन यांना चित्रपटाबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागले. दिग्दर्शकावर अनेक प्रकारचे आरोपही करण्यात आले आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेला 32 हजारांचा आकडाही त्यांना भारी पडला.

5 मे रोजी रिलीज झालेल्या ‘द केरळ स्टोरी’मध्ये ISIS कडून ब्रेनवॉश झालेल्या राज्यातील तीन मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. ते इस्लाम धर्म स्वीकारतात. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इडवानी यांच्या भूमिका आहेत. प्रत्येकाचे काम लोकांना खूप आवडले आहे. मात्र, सुरुवातीपासूनच वादात सापडलेल्या ‘द केरळ स्टोरी’लाही अनेक ठिकाणी बंदीला सामोरे जावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *