Sidharth Shukla | ‘सिड परत ये…’, तिच बॉडी, तोच चेहरा हुबेहूब सिद्धार्थसारखा दिसणारा ‘हा’ तरुण कोण? – Marathi News | Social media boy look like Sidharth Shukla his photo and video viral on social media

मनोरंजनसिद्धार्थ शुक्ला याने २०२१ मध्ये जगाचा अखेरचा निरोप घेतला.. पण आजही चहत्यांच्या मनात सिडच्या आठवणी कायम आहेत.. सध्या सिद्धार्थ याच्यासारख्या दिसणाऱ्या तरुणाची चर्चा आहे…

मुंबई : ‘बिग बॉस १३’ शोचा विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं २०२१ मध्ये निधन झालं. अभिनेत्याच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला.. अनेक मालिका, सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकरणाऱ्या सिद्धार्थ शुक्ला याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.. आज सिद्धार्थ जिवंत नसला तरी त्याच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत. ‘बिग बॉस १३’ शो दरम्यानच्या असंख्य आठवणी आजही चाहते विसरू शकलेले नाही. महत्त्वाचं म्हणजे सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शहनाज गिल यांच्यातील केमेस्ट्री.. दोघाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.. पण सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ शुक्ला याच्यासारख्या दिसणाऱ्या तरुणाची चर्चा रंगत आहे..

सिद्धार्थ शुक्ला प्रमाणे दिसणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल.. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तरुणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही चाहते तो सिद्धार्थसारखा दिसत असल्याचं सागंत आहे, तर काही चाहते मात्र सिद्धर्थ प्रमाणे दिसत नसल्याचं सांगत आहे.. सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या तरुंणाचं नाव चंदन असं आहे…

व्हिडीओ पाहून काही चाहते, ‘सिड परत ये…’ असं म्हणत आहे. सध्या सोशल मीडियावर चंदन नावाच्या तुरुणाची तुफान चर्चा रंगत आहे. व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्यासारख्या दिसणाऱ्या तरुणाची चर्चा रंगत आहे…

हे सुद्धा वाचासिद्धार्थ शुक्ला याच्याबद्दल सांगायचं झालं तर, २०२१ मध्ये अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.. सिद्धार्थच्या निधनानंतर कुटुंबावर आणि अभिनेत्री शहनाज गिल हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.. आजही शहनाज कोणत्याही कार्यक्रमात सिद्धार्थची आठवण काढते.. या मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी शहनाज हिला मोठा काळ लागला…

शहनाजने आता तिच्या करियरवर लक्ष केंद्रीत केलं आहे. नुकताच अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनेता सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून शहनाज चाहत्यांच्या भेटीस आली.. चाहते आता शहनाजच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत…

शहनाज गिल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.. सोशल मीडियावर शहनाज हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.. शहनाजचा आजही चाहते ‘सिजनाज’ म्हणून उल्लेख करतात.. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शहनाज कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते..Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *