Ashish Vidyarthi यांची संपत्ती जाणून व्हाल थक्क; वयाच्या ६० व्या वर्षी केलंय दुसरं लग्न – Marathi News | Ashish Vidyarthi and second wife rupali barua net worth

मनोरंजन



फक्त आशिष विद्यार्थीनीच नाही तर, दुसरी पत्नी रुपाली बरुआ देखील गडगंज संपत्तीची मालकीण.. दोघांच्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क…

मुंबई : प्रेम म्हणजे एक भावना असते… प्रेमाला कोणतंही बंधन नसतं… प्रेमाला वयाची मर्यादा नसते… असे अनेक समज प्रेमाबद्दल तुम्ही ऐकले असतील… अनेक ठिकाणी वाचले असतील.. पण अभिनेlते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी या सर्व गोष्टी साध्य करुन दाखवल्या आहेत.. गुरुवारी आशिष विद्यार्थी यांनी ३३ वर्ष लहान रुपाली बरुआ हिच्यासोबत लग्न केलं.. ठाराविक पाहुण्याच्या उपस्थितीत आशिष आणि रुपाली यांचा विवाह सोहळा पार पडला.. रिपोर्टनुसार, रुपाली बरुआ हे फॅशन इंडस्ट्रीतील फार मोठं नाव आहे.. कोलकात्ता याठिकाणी रुपाली हिचं स्वतःचं भव्य फॅशन स्टोर आहे.. एवढंच नाही तर, दोघांच्या संपत्तीचा आकडा देखील फार मोठा आहे..

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आशिष विद्यार्थी यांनी फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर, तामिळ, तेलुगू, कन्नाड सिनेविश्वात देखील मोलाचं योगदान दिलं आहे. रिपोर्टनुसार, आशिष विद्यार्थी यांची नेटवर्थ १० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ८२ कोटी रुपये आहे.. त्यांच्या एका महिन्याच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याची महिन्याची कमाई १० लाख रुपयांपेक्षा देखील अधिक आहे..

आशिष विद्यार्थी एका सिनेमात भूमिका साकारण्यासाठी जवळपास २५ लाख रुपये मानधन घेतात.. आशिष विद्यार्थी यांनी आतापर्यंत ११ भाषांमधील ३०० सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारात चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आशिष विद्यार्थी आणि त्यांच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगत आहे..

हे सुद्धा वाचा



आशिष विद्यार्थी यांची दुसरी पत्नी रुपाली बरुआ हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, रुपाली पती आशिष विद्यार्थी यांच्यापेक्षा ३३ वर्ष लहान आहे. वयासोबतच त्यांच्या संपत्तीमध्ये देखील मोठं अंतर आहे. रिपोर्टनुसार रुपाली हिच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, तिच्याकडे जवळपसा ८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. रुपाली मॉडेलिंग, जाहिराती आणि सोशल मीडियाच्यामाध्यमातून कमाई करते…

एवढंच नाही तर, रुपाली उद्योजिका आहे.. रुपाली प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्लूएन्सर देखील आहे. सोशल मीडियावर रुपालीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रुपाली कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते..

आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, आशिष विद्यार्थी याचं पहिलं लग्न प्रसिद्ध अभिनेत्री शंकुतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआ यांच्यासोबत झालं होतं. पहिल्या लग्नानंतर वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *