निर्माते जे. डी. मजेठिया यांनी पापाराझींशी बोलताना शोक व्यक्त केला. “हे अत्यंत दु:खद आहे. ती तिच्या होणाऱ्या पतीसोबत हिमाचलला फिरायला गेली होती. डिसेंबरमध्ये त्यांचं लग्न होणार होतं. तिथे एका वळणावर त्यांनी गाडी थांबवली होती आणि..”

Vaibhavi Upadhyaya
Image Credit source: Instagram
कुलू : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेत जास्मिनची भूमिका साकारून अभिनेत्री वैभवी उपाध्याय घराघरात पोहोचली. वैभवीच्या निधनाची बातमी कळताच टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांसोबतच सर्वसामान्यांनाही मोठा धक्का बसला. अवघ्या 32 व्या वर्षी वैभवीने कार अपघातात आपला जीव गमावला. 22 मे रोजी हिमाचल प्रदेश इथं अपघातात तिचं निधन झालं. हिमाचल प्रदेशात कुलू इथं फिरत असताना वैभवीच्या गाडीचा अपघात झाला. अरुंद रस्त्यावरून जात असताना एका वळणावर समोरून आलेल्या ट्रकला जागा करून देण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या अगदी कडेला गाडी थांबवली होती. मात्र बाजूने जाताना ट्रकचा धक्का लागल्याने गाडी दरीत कोसळली.