Shubman Gill | ‘कोणती सारा… तेंडुलकर की खान?’, शुभमन गिलच्या ‘या’ वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण… – Marathi News | Shubman Gill dating Sara Ali Khan or Sara Tendulkar

मनोरंजन



शुभमन गिल याच्या आयुष्यात नक्की कोणत्या सारासाठी खास स्थान, खान की तेंडुलकर? क्रिकेटर पुन्हा ‘लव्ह लाईफ’मुळे चर्चेत… आता असं म्हणाला तरी काय?

मुंबई : क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill) त्याच्या क्रिकेट स्किल्समुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. रिपोर्टनुसार शुभमन गिल क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिला डेट करत असल्याचं समोर येत आहे.. पण अभिनेता सैफ अली खान याची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिच्यासोबत देखील शुभमन याला डिनर डेट दरम्यान स्पॉट करण्यात आलं होतं.. त्या भेटीनंतर शुभमन आणि सारा अली खान यांच्या नावाची देखील तुफान चर्चा रंगू लागली.. अशात शुभमन नक्की कोणत्या साराला डेट करत आहे.. अशा तुफान चर्चा रंगल्या.. पण आता एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.. व्हिडीओमध्ये शुभमन याने त्याच्या ‘लव्ह लाईफ’बद्दल मोठा खुलासा केला आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शुभमन आणि त्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.

काही दिवसांपूर्वी शुभमन पंजाबी शो ‘दियां गल्ला’मध्ये आला होता.. यावेळी त्याने त्याच्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगितल्या. सांगायचं झालं तर हा शो पंजबी अभिनेत्री सोनम बजवा हिने होस्ट केला होता.. तेव्हा सोनम हिने शुभमनला प्रश्न विचारला की, ‘बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री कोण आहे?’ या प्रश्नाचं उत्तर देताना क्रिकेटरने क्षणाचाही विलंब न करता अभिनेत्री सारा अली खान हिचं नाव घेतलं..

पुढे शुभमनला विचारलं ‘तू साराला डेट करत आहेस?’ या क्रिकेटर म्हणाला, ‘हो पण, नाही पण…’ त्यानंतर सोनम म्हणाली खरं सांग… यावर शुभमन म्हणाला, ‘सारा का सारा सच बोला’ सध्या शुभमन गिल याची जुनी मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे…

हे सुद्धा वाचा



क्रिकेटरच्या व्हिडीओवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत.. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कोणती सारा…’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘सारा तेंडुलकर की सारा अली खान…’ सध्या सर्वत्र शुभमन गिल याच्या जुन्हा व्हिडीओची तुफान चर्चा रंगत आहे..

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये डिनर डेटदरम्यान सारा अली खान आणि शुभमन गिल यांना स्पॉट करण्यात आलं.. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्या तुफान चर्चेत आल्या… शुभमन गिल याच्यासोबत नात्याच्या चर्चा रंगण्यापूर्वी सारा अली खान लव आज कलचा को-स्टार कार्तिक आर्यनला डेट करत होती.. याचा खुलासा खुद्द साराने कॉफी विथ करण 7 मध्ये केला होता..

साराच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच अभिनेता विकी कौशल याच्यासोबत ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. लग्न, रोमांस, घटस्फोट… पती – पतीच्या नात्याभोवती फिरणारा ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अभिनेता विकी कौशल आणि आणि अभिनेत्री सारा अली खान एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *