सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी राग व्यक्त करत आहेत. विकीला सर्वसामान्यांप्रमाणे सलमानपासून दूर ढकललं गेलं, असं काहींनी लिहिलं आहे. तर कतरिनामुळे सलमान आणि विकी यांच्या नात्यात कटुता आल्याचं काहींनी म्हटलंय.

Salman Khan and Vicky Kaushal
Image Credit source: Instagram
अबू धाबी : अभिनेता सलमान खान सध्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यासाठी अबू धाबीत आहे. सलमानसोबतच अभिषेक बच्चन, विकी कौशल, फराह खान आणि राजकुमार राव हे कलाकारसुद्धा पुरस्कार सोहळ्यासाठी अबू धाबीला पोहोचले आहेत. हे सर्वजण आयफा पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहेत. नुकतीच या पुरस्कार सोहळ्यासंदर्भात एक पत्रकार परिषद पार पडली. IIFA 2023 च्या पत्रकार परिषदेतील सलमान आणि विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये सलमानने विकीकडे साफ दुर्लक्ष केल्याचं पहायला मिळत आहे. सलमानच्या बॉडीगार्डने ज्याप्रकारे विकीला बाजूला केलं, ते पाहून चाहत्यांनीही राग व्यक्त केला आहे.