Raghav Chadha यांनी अटी मान्य केल्यानंतर परिणीती चोप्राने दिला साखरपुड्यासाठी होकार; सत्य समोर – Marathi News | Bollywood actress Parineeti Chopra engagement contract with raghav chadha

मनोरंजन



साखरपुड्याआधी परिणीती चोप्राने घातलेल्या अटी राघव चड्ढा यांनी सर्वांसमोर केल्या मान्य; सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा..

Raghav Chadha यांनी अटी मान्य केल्यानंतर परिणीती चोप्राने दिला साखरपुड्यासाठी होकार; सत्य समोर

Image Credit source: Instagram

मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा मोठ्या थाटात संपन्न झाला. साखरपुड्याआधी अनेक महिने बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळात परिणीती आणि राघव यांच्या नात्याची चर्चा रंगत होती.. पण दोघांनी किंवा चोप्रा, चड्ढा कुटुंबाने नात्याबद्दल मौन बाळगलं होतं. आता पुन्हा राघव आणि परिणीती त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. साखरपुड्याआधी परिणीती हिने खासदार राघव चड्ढा यांच्यासमोर काही अटी ठेवल्या होत्या अभिनेत्रीच्या सर्व अटी राघव चड्ढा यांनी मान्य केल्यानंतर साखरपुडा संपन्न झाला.. सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे..

परिणीती हिने साखरपुड्यात राघव चड्ढा यांच्यासमोर अटी ठेवल्या होत्या. पण त्यासाठी राघव चड्ढा यांच्याकडे फक्त एकच पर्याय होता. रिपोर्टनुसार, साखरपुड्यात अभिनेत्रीने एक कॉन्ट्रॅक्ट सर्वांसमोर वाचला.. परिणीती म्हणाली, ‘राघव यांच्यासाठी हा साखरपुड्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी होकार द्यावा लागेल. तेव्हा ठरवू रोका कायम ठेवायचा की नाही…’

परिणीतीच्या विनोदी अटींवर राघव चड्ढा म्हणाले, ‘मी राघव चड्ढा यांचा सर्व गोष्टींसाठी माझा होकार आहे… ‘, पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मान्य करा परिणीतीच कायम बरोबर असेल..’ सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील विनोदी क्षणांची चर्चा रंगत आहे.. परिणीती हिचा कॉन्ट्रॅक्ट ऐकल्यानंतर जमलेले पाहुणे देखील पोट धरुन हसू लागले..

हे सुद्धा वाचा



कधी होणार राघव – परिणीती यांचं लग्न ?

मिळालेल्या माहितीनुसार, राघव – परिणीती यांचं लग्न शाही थाटात होणार आहे. दोघांचं लग्न फार रॉयल असणार आहे. लग्नात फक्त जवळच्या व्यक्तींना निमंत्रीत करण्यात येणार आहे. हिवाळ्यात राघव – परिणीती विवाहबंधनात अडकणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. राघव – परिणीती यांचं लग्न ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांच्या लग्नात अभिनेत्र प्रियांका चोप्रा देखील उपस्थित राहणार आहे.

रिपोर्टनुसार, राघव – परिणीती राजस्थान याठिकाणी शाही थाटात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. अन्य सेलिब्रिटींप्रमाणे राघव – परिणीती यांचं लग्न देखील रॉयल आणि प्रायव्हेट असणार आहे… दोघांच्या लग्नात अनेक दिग्गज व्यक्ती राघव – परिणीती यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *