Radhe Maa यांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांना मोजावे लागतता लाखो रुपये; सेलिब्रीटीही असतात रांगेत – Marathi News | Radhe Maa charge big amount for her darshan

मनोरंजनवादग्रस्त राधे माँ यांच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींची देखील लागते रांग… राधे माँ यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांना मोजावे लागतात लाखो रुपये, आकडा जाणून व्हाल थक्क

मुंबई : अनेक प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राधे माँ पुन्हा एका खास कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. स्वतःला राधेचा अवतार म्हणवणाऱ्या राधे माँ शिष्यांकडून स्वतःची पूजा करुन घेताना अनेकदा समोर आल्या. ‘बिग बॉस १४’ मध्ये राधे माँ झळकल्या आहेत. स्वतःच्या नावाने होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये नाचनाऱ्या राधे माँ यांना तुम्ही पाहिलं असेल. राधे माँ यांचं खरं नाव सुखविंदर कौर आहे. वयाच्या १७ व्या वर्षी राधे माँ यांचं लग्न पंजाबमधील मोहन सिंग नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. मोहन सिंग मिठाईच्या दुकानात काम करायचे आणि घर चालवण्यासाठी राधे माँ देखील शिवणकाम करायच्या. त्यानंतर एकदा सुखविंदर कौर (राधे माँ) महंत श्री रामदीन दास यांना भेटल्या आणि त्यानंतर राधे माँ यांचं पूर्ण आयुष्य बदललं..

सुखविंदर कौर यांनी महंत श्री रामदीन दास यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या ड्रेसपासून त्यांच्या नावापर्यंत सर्व काही बदललं. सुखविंदर कौर यांना लोक राधे माँच्या नावाने ओळखू लागले. राधे माँ स्वतःला दुर्गा मातेचा अवतार मानतात आणि राधे माँ यांच्याकडे दैवी शक्ती आहे असा भक्तांचाही विश्वास आहे. राधे माँ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात..

महत्त्वाची गोष्ट म्हणजे राधे माँ यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सामान्य लोकच नाही तर झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी देखील रांग लावतात. मनोज तिवारी, रवी किशन, मनोज बाजपेयी, डॉली बिंद्रा आणि गजेंद्र चौहान या दिग्गजांच्या नावांच्या नावाचा या यादीमध्ये समावेश आहे. पण भक्तांना दर्शन देण्यासाठी राधे माँ लाखो रुपये आकारतात.

हे सुद्धा वाचाराधे माँ यांचं मुंबईमध्ये आश्रम आणि एक मंदिर आहे. राधे माँ अनेकदा जागरण आणि सत्संग आयोजित करतात. यादरम्यान त्यांच्या दर्शनासाठी हजारो लोक जमतात. मात्र राधे माँ यांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांना मोठी रक्कम मोजवी लागते. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा एखादा भक्त ‘माता की चौकी’ आयोजित करतो तेव्हा, भक्ताला किंमतीची यादी दिली जाते. भक्तांना ‘माता की चौकी’साठी तब्बल ५ ते ३५ लाख रुपये मोजावे लागतात..

राधे माँ यांच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

राधे माँ यांच्या मुलाचं नाव हरजिंदर सिंह (Harjinder Singh) आहे. हरजिंदर एक अभिनेता असून त्याने अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं आहे. राधे माँ यांच्या मुलगा बॉलिवूडमध्ये यशाच्या उच्च शिखरावर चढत आहे. सध्या हरजिंदर त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. हरजिंदर लवकरच अभिनेता रणदीप हुड्डा याच्यासोबत ‘इंस्पेक्टर अविनाश’ (Inspector Avinash) या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *