‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, सिद्धी इदनानी, योगिता बिहानी आणि सोनिया बलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल याठिकाणी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता.

Adah Sharma and Nawazuddin Siddiqui
Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी गेल्या काही काळापासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. आता पत्नी आलियासोबतचा त्याचा वाद संपुष्टात आल्याचं कळतंय. दोघं एकमेकांच्या चुका विसरून पुन्हा नवीन आयुष्याची सुरुवात करत आहेत. तर दुसरीकडे नवाजुद्दीनचा ‘जोगिरा सारा रा रा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सहअभिनेत्री नेहा शर्मासोबत या चित्रपटाचं प्रमोशन करत होता. याच प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याला ‘द केरळ स्टोरी’वरील बंदीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या चित्रपटाबाबत नवाजुद्दीनचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता नवाजुद्दीनने ट्विट करत राग व्यक्त केला आहे.