‘सलमान खान एका कोपऱ्यात बसून रडत असेल’, असं एकाने लिहिलंय. तर ‘सलमान खान एका कोपऱ्यात बसून हसत असेल’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘दोघंही सलमान खानचे शत्रू आहेत’ असंही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे.

Abhishek Bachchan Vicky Kaushal and Salman Khan
Image Credit source: Instagram
अबू धाबी : इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स (IIFA) लवकरच अबू धाबीच्या यास आयलँड याठिकाणी पार पडणार आहे. यासाठी बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी अबू धाबीला पोहोचले आहेत. 27 मे रोजी पुरस्कार सोहळा पार पडणार असून त्यापूर्वी 25 मे रोजी आयोजकांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेला सलमान खान, अभिषेक बच्चन, विकी कौशल, फराह खान, राजकुमार राव, नोरा फतेही, रकुल प्रीत सिंह, अमित त्रिवेदी, सुनिधी चौहान यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. फराह खान आणि राजकुमार राव हे शुक्रवारी पार पडणाऱ्या IIFA रॉक्स या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. तर अभिषेक बच्चन आणि विकी कौशल हे शनिवारी मूळ पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करतील.