सिटी ऑफ ड्रीम्सचे पहिले दोन सिझनसुद्धा हॉटस्टारवर प्रदर्शित झाले होते. या दोन्ही सिझनमध्ये कलाकारांची मोठी फौज पहायला मिळाली. नागेश कुकनूर दिग्दर्शित या नाटकात अतुल कुलकर्णी आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतच अभिनेत्री प्रिया बापटचीही मुख्य भूमिका आहे.

Image Credit source: Instagram
मुंबई : ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सीरिजच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आता लवकरच या सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणाऱ्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स 3’ या वेब सीरिजची कथा काल्पनिक आहे. ही कथा खरी नाही किंवा वास्तव जीवनापासून प्रेरित नाही. मात्र तरीही या सीरिजच्या ट्रेलरमधील अमेय गायकवाडचा एक व्हिडीओ आणि सीरिजची झलक प्रेक्षकांना हा प्रश्न विचारण्यास भाग पाडते की ‘या सीरिजच्या कथेचा ट्रॅक महाराष्ट्रात घडलेल्या सत्ताबदलाच्या घटनांपासून प्रेरित आहे का?’ टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगावकर (जग्या) आणि अतुल कुलकर्णी (अमेयराव गायकवाड) यांनी दिलेलं उत्तर पेचात पाडणारं आहे.