Ashish Vidyarthi | वयाच्या ६० व्या वर्षी दुसरं लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी यांची पहिली प्रतिक्रिया – Marathi News | Ashish Vidyarthi breaks silence on second marriage with Rupali Barua

मनोरंजन‘रुपाली हिच्यासोबत लग्न करणं म्हणजे…’, ३३ वर्ष लहान महिलेसोबत लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी यांची पहिली प्रतिक्रिया ऐकून व्हाल हैराण..

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक आशिष व‍िद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या ६० व्या वर्षी ३३ वर्षीय लहान रुपाली बरुआ (Rupali Barua) हिच्यासोबत लग्न केलं आहे. रुपाली हिच्यासोबत आशिष विद्यार्थी यांचं दुसरं लग्न आहे.. आशिष आणि रुपाली यांनी लग्न मोठ्या थाटात नाही तर, अत्यंत साध्या पद्धतीत केलं. गुरुवारी आशिष आणि रुपाली यांनी त्यांच्या नात्याला पती-पत्नीचं नाव दिलं.. आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दुसरं लग्न केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.. सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त आशिष आणि रुपाली यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. रुपाली हिच्यासोबत लग्न केल्यानंतर आशिश विद्यार्थी यांनी भावना व्यक्त केल्या आहे..

दुसऱ्या लग्नाबद्दल आशिष विद्यार्थी म्हणाले, ‘आयु्ष्याच्या या टप्प्यात रुपाली हिच्यासोबत लग्न करणं माझ्यासाठी एक असामान्य अनुभव आहे… सकाळी आमचं कोर्ट मॅरेज झालं आहे… सध्यांकाळी छोट्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं.. आमची लव्हस्टोरी मोठी आहे… त्यामुळे नंतर सांगेल…’ नव्या आयुष्याला सुरुवात केल्यामुळे आशिष विद्यार्थी आनंदी आहेत..

एवढंच नाही तर, रुपाली बरुआ हिने देखील आशिष विद्यार्थी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. ‘काही दिवसांपूर्वी आमची भेट झाली.. त्यानंतर आम्ही आमच्या नात्याला नवं नाव देण्याचं ठरवलं. आमचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीत व्हावं अशी आमच्या दोघांची इच्छा होती..’ असं रुपाली म्हणाली..

हे सुद्धा वाचागुरुवारी कोलकाता येथे पार पडलेल्या या लग्नात फक्त आशिष आणि रुपाली यांचं कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर आता हे कपल मित्र आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टी ठेवणार आहेत. आशिष यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, रुपाली आसाममधील फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथील रहिवासी रुपाली ही कोलकात्यातील एका फॅशन स्टोअरची मालकीण आहे.

आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, आशिष विद्यार्थी याचं पहिलं लग्न प्रसिद्ध अभिनेत्री शंकुतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआ यांच्यासोबत झालं होतं. पहिल्या लग्नानंतर वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे..

आशिष विद्यार्थी हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.. अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.. आशिष विद्यार्थी यांनी आतापर्यंत ११ भाषांमधील ३०० सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारात चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.. शिवाय आशिष विद्यार्थी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *