Ashish Vidyarthi | ‘त्यांच्या नावातच ”विद्यार्थी” आहे, म्हणून..’, दुसऱ्या लग्नामुळे आशिष विद्यार्थी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर – Marathi News | Ashish Vidyarthi second marriage with Rupali Barua trending on social media

मनोरंजनविद्यार्थी जीवनात अनेक नव्या गोष्टी करता येतात, शिकता येतात.. अशात आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी दुसरं लग्न केल्यामुळे, ‘ते अद्यापही ”विद्यार्थी” आहेत..’ असं म्हणत आहेत…

मुंबई : विद्यार्थी म्हटलं की नवे अनुभव, नव्या गोष्टींकडे होणारी वाटचाल… इत्यादी गोष्टी डोळ्यासमोर येतात.. पण अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी ३३ वर्षीय लहान महिलेसोबत लग्न केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या फक्त सोशल मीडियावरच नाही तर, अनेक ठिकाणी आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगत आहे.. गुरुवारी आशिष विद्यार्थी यांनी ३३ वर्ष लहान रुपाली बरुआ हिच्यासोबत लग्न केलं.. ठाराविक पाहुण्याच्या उपस्थितीत आशिष आणि रुपाली यांचा विवाह सोहळा पार पडला.. आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाची माहिती सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने सोशल मीडियात्या माध्यमातून दिली..

आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत विरभ भयानी याने कॅप्शनमध्ये Love is blind असं लिहिलं आहे.. सध्या सर्वत्र आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे.. पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे..

हे सुद्धा वाचाकाही नेटकऱ्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत, काहींनी मात्र आशिष विद्यार्थी यांची खिल्ली उडवली आहे.. एक नेटकरी आशिष विद्यार्थी यांच्या फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘त्यांच्या नावातच लिहिलं आहे की ते अद्यापही ”विद्यार्थी” आहेत. तर ते करु शकतात..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे..

आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, आशिष विद्यार्थी याचं पहिलं लग्न प्रसिद्ध अभिनेत्री शंकुतला बरुआ यांची मुलगी राजोशी बरुआ यांच्यासोबत झालं होतं. पहिल्या लग्नानंतर वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे..

आशिष विद्यार्थी हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे.. अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.. आशिष विद्यार्थी यांनी आतापर्यंत ११ भाषांमधील ३०० सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारात चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.. शिवाय आशिष विद्यार्थी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आशिष विद्यार्थी यांनी ‘गुडबाय’ , ‘कहो ना प्यार है’, ‘आर.. राजकुमार’, ‘बादल’, ‘भिमा’, ‘वास्तव’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आशिष विद्यार्थी यांनी फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर, तामिळ, तेलुगू, कन्नाड सिनेविश्वात देखील मोलाचं योगदान दिलं आहे.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *