‘नात्यात आलेले उतार – चढाव….’, आशिष विद्यार्थी पहिल्या पत्नीपासून का झाले विभक्त? दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्याने व्हिडीओ पोस्ट करत केला मोठा खुलासा

मुंबई : ‘प्रत्येकाच्या आयुष्यात एक सारखी होष्ट असते, ती म्हणजे आनंद.. मला कोणत्या रिलेशिपमध्ये नव्हतं राहायचं म्हणून मी रुपालीला लग्नासाठी विचारलं.. तिने होकार दिला.. ‘ बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायक आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) हिच्यासोबत लग्न केलं आहे. रुपाली हिच्यासोबत आशिष विद्यार्थी यांचं दुसरं लग्न आहे.. आशिष आणि रुपाली यांनी लग्न मोठ्या थाटात नाही तर, अत्यंत साध्या पद्धतीत केलं. दुसरं लग्न केल्यानंतर आशिष विद्यार्थी यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सर्वत्र आशिष विद्यार्थी यांच्या व्हिडीओची चर्चा आहे.. अभिनेत्याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.