आशिष यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 300 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यापैकी बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. आता दुसऱ्या लग्नानंतर सोशल मीडिया युजर्स त्यांच्यावर ‘रिअल लाइफ विलेन’ म्हणूनही टीका करत आहेत.

Ashish Vidyarthi’s second marriage
Image Credit source: Instagram
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. आशिष यांनी अभिनेत्री राजोशी बरुआ यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. या दोघांना 23 वर्षांचा मुलगा आहे. आता रुपाली बरुआशी त्यांनी दुसरं लग्न केलं आहे. एकीकडे काही जण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर दुसरीकडे काही जण त्यांना ट्रोलसुद्धा करत आहेत. यामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्याचाही समावेश आहे. ‘थोडीतरी लाज बाळगा’ असं त्या अभिनेत्याने ट्विट करत आशिष यांना सुनावलं आहे.