हृतिक, आमिरचा नकार सलमानच्या पथ्यावर पडला, तूफान कमाई करत ‘या’ चित्रपटाने मोडले सर्व रेकॉर्ड्स – Marathi News | Salman khan super hit film was rejected by aamir khan and Hritik roshan

मनोरंजनसलमान खान हा इंडस्ट्रीचा सुपरस्टार मानला जातो. सलमान हा प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली पसंती आहे. त्याच्या नावावर चित्रपट चालतात.

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (salman khan) हा इंडस्ट्रीचा सुपरस्टार मानला जातो. सलमान हा प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली पसंती आहे. प्रत्येकालाच त्याच्यासोबत काम करायचं असतं. त्याच्या नुसत्या नावावरही चित्रपट चालतात. अशा परिस्थितीत त्याच्या बजरंगी भाईजान (Bajrangi Bhaijaan)या चित्रपटाबाबत एक रंजक बातमी समोर आली आहे. तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटासाठी सलमान खान हा अभिनेता म्हणून पहिली पसंती नव्हती.

२०१५ साली आलेला बजरंगी भाईजान हा सलमानचा आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. सलमान खान, हर्षाली मल्होत्रा, नवाजुद्दिन सिद्दीकी या सर्वांच्याच अप्रतिम अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. पण तुम्हाला माहित आहे का, की या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी सलमान खान हा काही पहिली पसंती नव्हती. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या आधी हा चित्रपट आमिर खान आणि हृतिक रोशनला ऑफर करण्यात आला होता. पण काही कारणास्तव दोघांनीही चित्रपट करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत हा चित्रपट सलमान खानच्या हातात पडला. त्यांचा नकार सलमानच्या पथ्यावर पडला आणि त्याला हा चित्रपट मिळाला.

या चित्रपटाबद्दल असा दावा करण्यात आला होता की, या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन करणार होते आणि त्यात ते त्यांचा मुलगा हृतिकला कास्ट करणार होते. पण काही कारणास्तव राकेश रोशन चित्रपटातून बाजूला झाले आणि नंतर कबीर खानने हा चित्रपट पुन्हा दिग्दर्शित केला.

बजरंगी भाईजान हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटातील सलमानच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. चित्रपटाच्या कथेपासून प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटानंतरच सलमान खानला भाईजान हे नाव पडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले. हा चित्रपट सलमानसाठी खूप लकी ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *