वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याची अशी अवस्था! त्याला ओळखणं देखील कठीण – Marathi News | Neil nitin mukesh some photo viral on social media Actor look like Amitabh Bachchan

मनोरंजनबॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची वयाच्या ४१ व्या वर्षी अशी अवस्था! त्याला पाहून चाहते थक्क.. ओळखणं देखील कठीण, कोण आहे ‘तो’?

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आहेत जे वयाच्या ६० व्या वर्षी देखील फिट आहेत. एवढंच नाही तर बॉलिवूडचे काही अभिनेते स्वतःला फिट ठेवण्यासाठी कायम व्यायाम, योगा आणि जीम करत असतात. शिवाय सोशल मीडियावर वक्रआऊटचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना फिट राहण्याचं महत्त्व सांगत असतात.. अभिनेत्यांच्या पोस्टवर चाहते देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षावर करतात.. पण आता बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटो पाहून अभिनेत्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे… सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.. फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील अभिनेत्याला ओळखल नसेल…

वयाच्या ४१ व्या वर्षी अभिनेता एका वृद्ध आणि थकलेल्या व्यक्ती सारखा दिसत आहे. अभिनेत्याचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसला असेल.. हा अभिनेता कोण आहे, त्याने कोणत्या सिनेमांमध्ये काम केलं असेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.. पण अभिनेत्याची अशी अवस्था पाहून तुम्ही त्याला ओळखू शकले नसाल..

फोटोमध्ये दिसणारा अभिनेता महानायक अमिताभ बच्चन यांच्यासारखा दिसत असल्याचं काही चाहत्यांचं म्हणणं आहे… पण सध्या ज्या अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि हँडसम अभिनेता नील नितिन मुकेश आहे… सध्या सर्वत्र निल याच्या फोटोंची चर्चा सुरु आहे..

नीलच्या फोटोंवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. एका चाहता कमेंट करत म्हणाला, ‘यावर विश्वास होत नाही आणि पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे..’ अन्य एक चाहता कमेंट करत म्हणाला, ‘हा खरंच नील तू आहेस.. यावर विश्वास होत नाही..’ सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या फोटोंची चर्चा तुफान रंगली आहे..

नील याने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली पण त्याला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही. नील नितीन मुकेश चंद माथूर उर्फ ​​नील नितीन मुकेश यांचा जन्म १५ जानेवारी १९८२ रोजी मुंबईत झाला. तो प्रसिद्ध बॉलिवूड गायक मुकेश यांचा नातू आहे.

पण नील याने संगीत क्षेत्र न निवडता अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या श्री राम राघवन यांच्या सिनेमा अ‍ॅक्शन-थ्रिलर सिनेमा जॉनी गद्दारमधून अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या नील याच्या नव्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *