मातीशी नाळ अजून जोडलेली… ज्या शाळेत शिकले त्याच शाळेचा पंकज त्रिपाठींनी केला कायापालट – Marathi News | Actor Pankaj Tripathi revamps his school in Bihar

मनोरंजनGovernment school renovated by Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी यांनी नुकतेच त्यांच्या गावातील शाळेचे नूतनीकरण केले आहे. ही तीच शाळा आहे जिथे ते स्वतः शिकत होते. पंकजच्या या कामावर त्यांचे गावकरी खूप खूश आहेत.

मातीशी नाळ अजून जोडलेली... ज्या शाळेत शिकले त्याच शाळेचा पंकज त्रिपाठींनी केला कायापालट

Image Credit source: instagram

मुंबई : चित्रपट विश्वात असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी त्यांचं गाव सोडून मायानगरीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता हे कलाकार इतके प्रसिद्ध आहेत की त्यांच्यासाठी विशेष भूमिका लिहील्या जातात. असेच एक कलाकार म्हणजे पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi). पंकज हे मूळचे बिहारमधील एका छोट्या गावातील आहेत. तेथून बाहेर पडून ते मुंबईत आले आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये ठसा उमटवला. पण आजही पंकज हे आपली मुळं विसरलेले नाहीत आणि ते आपल्या गावी जात राहतात. यासोबतच ते आपल्या गावाच्या विकासासाठी सतत कार्यरत असतात. त्यांनी ज्या शाळेत एकेकाळी शिक्षण घेतले त्या शाळेची स्थिती सुधारत कायापालट केला आहे.

पंकज त्रिपाठी यांचा जन्म 28 सप्टेंबर 1976 रोजी झाला. ते बिहारमधील गोपालगंजचा रहिवासी आहेत. पंकजचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. या शाळेच्या विकासासाठी मुख्याध्यापक पंकज यांच्याशी बोलले असता त्यांनी या चांगल्या कामासाठी लगेच होकार दिला.

शाळेशी आहे खास नातं

पंकज त्रिपाठी यांच्या मते, ‘मुलांच्या विकासात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझ्याशी बोलले. शाळेची बाउंड्री वॉल आणि गेट बांधण्यासाठी पैशांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कारण बाहेर रस्ता आहे आणि मुले खेळताना त्या बाजूला जातात, त्यामुळे अपघाताचा धोका आहे. अशा परिस्थितीत मदत करणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटले. तसेच, मी स्वतः त्या शाळेत शिकलो होतो, त्यामुळे माझाही या शाळेशी संबंध होता.” पंकजने आपल्या भावाच्या मदतीने एक प्रकल्प तयार केला आणि पैशाची व्यवस्था करून शाळेचे नूतनीकरण केले.

पंकज त्रिपाठी सांगतात की जेव्हा त्यांनी गावातील शाळेला भेट दिली तेव्हा तिची अवस्था अतिशय वाईट होती. प्लॅस्टर पडत होते, रंग उतरला होता, पंखेही नीट काम करत नव्हते, दिव्यांची योग्य व्यवस्था नव्हती. अशा परिस्थितीत शाळा आणि मुलांच्या विकासासाठी या दिशेने काम करणे गरजेचे आहे, असे पंकज यांना वाटले. मिर्झापूरमधील कालेन भैय्या म्हणजेच पंकजच्या या कामामुळे सध्या संपूर्ण गाव खूश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *