माजी मिस्टर इंडियाचं वयाच्या ४२ व्या वर्षी निधन; वॉशरुममध्ये आढळला मृतदेह – Marathi News | Former mr india premraj arora passes away

मनोरंजनदेशातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोरा याचं निधन; वॉशरुममध्ये आढळला मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण

मुंबई : झगमगत्या विश्वातून आखणी एक वाईट बातमी येत आहे. गेल्या दोन दिवसात काही प्रसिद्ध सेलिब्रीटींनी अखेरचा श्वास घेतला.. आता देखील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नुकताच अभिनेते नितेश पांडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आता देशातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि माजी मिस्टर इंडिया प्रेमराज अरोरा याचं निधन झालं आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी प्रेमराज अरोरा याने अखेरचा श्वास घेतला.. प्रेमराज अरोरा याचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रेमराज अरोरा यांच्या निधनाची चर्चा रंगली आहे.. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते प्रेमराज अरोरा याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत..

४२ वर्षीय प्रेमराज अरोरा याचा मृतदेह गुरुवारी वॉशरुममध्ये आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. प्रेमराज अरोरा वर्कआऊट केल्यानंतर वॉशरुममध्ये गेला होता.. असं सांगण्यात येत आहे. वॉशरुममध्ये हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे प्रेमराज अरोरा याचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे. प्रेमराज अरोरा यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे..

हे सुद्धा वाचाप्रेमराज अरोरा याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमराज अरोरा कोणत्याही प्रकारची नशा करत नव्हता. तो फक्त त्याचं डायट फॉलो करायचा. फिटनेसकडे त्याचं लक्ष होतं.. प्रेमराज अरोरा हा फिटनेस कोच आणि इंस्ट्रक्टर देखील होता.. अशात प्रेमराज अरोरा याच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे..

प्रेमराज अरोरा त्याच्या बॉडी आणि लूकमुळे कायम चर्चेत असायचा.. २०१४ मध्ये त्याने मिस्टर इंडिया किताब आपल्या नावावर करत सर्वांचं लक्ष वेधलं.. प्रेमराज पत्नी आणि दोन मुलींना कायमसाठी मागे ठेवून गेला आहे.. वॉशरुममध्ये मिस्टर इंडिया प्रेमराज याचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे..

प्रेमराज अरोरा यांच्या निधनाने पुन्हा एकदा अभिनेता आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची घटना चर्चेत आली आहे. कारण राजू श्रीवास्तव हे देखील जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक बेशुद्ध झाले होते. रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. अनेक दिवस कोमात राहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *