नावघाट जवळ गोदावरी नदी पात्रात 40 वर्षीय अनोळखी माणसाचे प्रेत सापडले;पोलिसांचे जनतेला मदतीचे आवाहन

महत्वाच्या बातम्या








नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील नावघाट येथे गोदावरी नदीच्या पात्रात एका 40 वर्षीय अनोळखी माणसाचा मृतदेह सापडला आहे. इतवारा पोलिसांनी या अनोळखी मयत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी जनतेने मदत करावी असे आवाहन केले आहे.

गोदावरी जीव रक्षक दलातील सदस्य सय्यद अश्फाक सय्यद नूर यांनी दिलेल्या आज 20 मे रोजी ते दररोजचे काम करत नाव घाट परिसरात फिरत असताना गोदावरी नदीपात्रात किनाऱ्यापासून वीस मीटर अंतरावर एक प्रेत दिसले ते प्रेत गोदावरी जीव रक्षक दलाच्या सर्व सदस्यांनी मिळून काठावर आणले हा मयत पुरुष आहे. अनोळखी मयत माणसाचे वय 40 वर्षे असेल त्याने आपल्या शरीरावर काळ्या रंगाचा पॅन्ट आणि त्यावर पांढऱ्या रंगांसाठी शर्ट त्या टी-शर्ट वर आडव्या काळ्या पट्ट्यां आहेत हे कपडे परिधान केलेले आहेत.

इतवारा पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे. इतवाराचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर देवकते यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी मयत व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर त्यांनी याबाबतची माहिती इतवारा पोलीस ठाण्यात द्यावी जेणेकरून मयत व्यक्तीच्या कुटुंबाला शोधणे शक्य होईल.


Post Views: 23








Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *