
हिमायतनगर,(प्रतिनिधी)- हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 वर्षीय बालिकेवर एका 32 वर्षीय नराधमाने खाऊ देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केला. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस गजाआड करण्यात आले आहे.
आठ वर्षीय बालिकेस किराणा दुकानामधून खाऊ घेऊन देतो असे अमिष दाखवून नराधम दिगंबर थारो राठोड (32)याने 8 वर्षीय चिमुकलीस बाजूच्या शेतामध्ये नले. तेथे तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला. ही घटना दिनांक 25 मे रोजी सकाळी 8वाजेच्या सुमारास घडली. पीडित चिमुकली रडत असल्याचा आवाज आल्याने गावातील काही नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा नराधम आरोपीने तिथून पळ काढला. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून पिडित मुलीच्या आईने हिमायतनगर पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक स्मिता जाधव यांनी सहकारी पोलिसांच्या मदतीने या आरोपीस गजाआड केले आहे.
Post Views: 26