NA Land | बांधकामांसाठी जमीन एनए करून घेण्याची प्रक्रिया झाली सोप्पी ! महसूल विभागाने जाहीर केला नवीन शासन निर्णय

कृषीNA Land |एखाद्या जमिनीवर बांधकाम (construction) करायचे असल्यास जमीम एनए करून घ्यावी लागते. यासाठीची प्रक्रिया वेळखाऊ असते. दरम्यान आता राज्य शासनाने जमीन अकृषिक (Non Agriculture) म्हणजेच एनए करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार इथून पुढे सक्षम प्राधिकरणाने बांधकामांना परवानगी दिल्यास संबंधित जमीनधारकास अथवा विकसकास स्वतंत्रपणे एनए परवानगी घेण्याची आवश्‍यकता असणार नाही.

एनए प्रक्रिया झाली अधिक सोपी

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे एनए प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. यामुळे राज्यातील जमीनमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ मधील तरतुदीअन्वये सक्षम प्राधिकाऱ्याकडून एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात येत असताना अशा जमिनींमध्ये प्रस्तावित केलेला अकृषिक प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री केली जाते.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

तर एनए परवानगी घेण्याची गरज नाही

म्हणजेच अशा जमिनींकरिता महाराष्ट्र जमीन संहिता १९६६ च्या कलम ४२ अ, ४२ ब, ४२ क, ४२ ड आणि ४४ अ अन्वये स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्‍यकता नसल्याने किंवा त्या जमिनी अकृषिक वापरात रूपांतरित झाल्याचे मानण्यात येते. यामुळे या जमिनींबाबत सक्षम प्राधिकरणाने बांधकाम परवानगी दिल्यास जमीनधारकास स्वतंत्रपणे एनए परवानगी घेण्याची आवश्‍यकता नाही असे शासनाने म्हटले आहे.

शासन निर्णय जारी

एनए सनद ही संगणक प्रणालीद्वारे तयार होणार असून सनदेची एक प्रत ऑनलाइन गाव दफ्तरात नोंद घेण्यासाठी जाणार आहे व त्यापुढे अकृषिक कर भरण्याची जबाबदारी बांधकाम परवानगी घेणाऱ्यावर बंधनकारक राहील. असे देखील शासनाने म्हटले आहे. महसूल विभागाच्या कार्यासन अधिकारी शिल्पा पटवर्धन यांनी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

अशी असेल प्रक्रिया

१)जमीन भोगवटादार वर्ग-1ची असल्यास बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिम (बीपीएमएस) प्रणालीच आवश्‍यकता असेल तेथे रुपांतर कर वसूल केला जाईल
२)त्यानंतर विकास परवानगी सोबतच अकृषिक वापराची सनद देण्यात येईल.
३) जजमीन भोगवटदार वर्ग-२ ची असल्यास नजराणा किंवा शासकीय अधिमूल्य आदी रकमांची परिगणना करण्यात येईल आणि या रकमेचा भरणा केल्यानंतर एन ए परवानगी मिळेल.

Government makes NA land permission process easy

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *