Casting Couch | बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कास्टिंग काउचची शिकार, प्रसिद्ध दिग्दर्शकावर गंभीर आरोप – Marathi News | Shubh mangal mein dangal fame actress sangeeta odwani on casting couch

मनोरंजन



‘चांगला ब्रेक मिळविण्यासाठी तडजोड…’ बॉलिवूडची आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री कास्टिंग काउचची शिकार, तिने सांगितलेला अनुभव थक्क करणारा..

मुंबई : प्रसिद्धी, पैसा, संपत्ती.. यांसारख्या अनेक गोष्टींमुळे झगमगत्या विश्वाचं आकर्षण कित्येकांना असतं.. अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी मायानगरीत येत असतात.. पण नव्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. शिवाय फक्त अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांना देखील कास्टिंग काउच सारख्या वाईट अनुभवाचा सामना करावा लागतो. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांना आलेल्या कास्टिंग काउचचा अनुभव मोकळेपणाने सांगितला आहे.. आता देखील ‘शुभ मंगल में दंगल’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेल्या संगीता ओडवानी हिने कास्टिंग काउचचा आलेल्या धक्कादायक अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे..

अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाचं नाव न घेता आलेले अनुभव सांगितले आहेत.. अभिनेत्री म्हणाली, ‘एका लोकप्रिय दिग्दर्शकाने अभिनेत्रीला एकटी भेटण्यासाठी बोलावलं होतं.. पण जेव्हा अभिनेत्री एका मैत्रींणीसोबत ठरलेल्या ठिकाणा पोहोचल्यानंतर दिग्दर्शकाने मिटिंग रद्द केली.. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे..

संगीता म्हणाली, ‘कलाकारांचं आयुष्य सोपं नसतं.. विशेषतः तुम्ही नवीन आहात आणि इंडस्ट्रीमध्ये तुमच्या ओळखीचं कोणी नाही… तुम्हाला कायम शारीरिक संबंधांसाठी प्रभावित केलं जातं.. सतत तुमच्यावर निशाणा साधला जातो.. मला लक्षात आहे, माझ्या सुरुवातीच्या दिवसात, एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने प्रयत्न केले होते आणि मला एकटीला भेटण्यासाठी बोलावलं होतं…’

हे सुद्धा वाचा



पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तेव्हा मी, माझी मैत्रीण आणि सोनाली सिंग अभिनय क्षेत्रात ओळख निर्माण करण्यासाठी एकत्र मायानगरीत पोहोचलो होतो.. आम्ही एका ऑडिशनसाठी एकत्र गेलो होतो.. पण त्यानंतर त्या दिग्दर्शकाला भेटण्यासाठी मी मैत्रींणींसोबत पोहोचली तेव्हा त्याने मिटिंग रद्द केली.. तो मला ब्रेक देणार होता म्हणून त्याला मला एकांतात भेटायचं होतं…’

संगीता म्हणाली की निर्मात्याचा हेतू योग्य नसल्याचा तिला अंदाज होता, पण तिने त्याची तक्रार न करण्याचा किंवा त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. संगीता म्हणाली, मला त्याच्या हेतूंवर खरोखर शंका येत होती.. परंतु तो लोकप्रिय आणि खूप शक्तिशाली होता, म्हणून त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी, आम्ही तेथून निघालो..

धक्कादायक घटनेचा सामना केल्यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही.. त्या घटनेनंतर अभिनेत्री पुन्हा कामाच्या शोधात फिरु लागली… अखेर कौशल्याच्या जोरावर संगीताने स्वतःची ओळख निर्माण केलं.. संगीता म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये चांगला ब्रेक मिळविण्यासाठी तडजोड करण्याची गरज आहे..हे सत्य आहे का? पण देवाच्या कृपेने मी स्वतःला संधी दिली आणि सिद्ध करुन दाखवलं..कोणतीही गोष्ट व्यक्तीवर अवलंबून असते.. शॉर्टकटचा मार्ग धरायचा की स्वतःच्या मेहनतीवर आणि नियतीवर विश्वास ठेवून सतत प्रयत्न करत रहायचे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *