Acidity | पित्तापासून वाचण्यासाठी अँटासिड्स खाताय तर सावधान ! उद्भवू शकतात ‘या’ समस्या

कृषीAcidity |अनेकांना पित्ताचा (Acidity) त्रास होतो. यावर उपाय म्हणून मुख्यतः अँटासिड्स खाल्ले जाते. काही लोक तर जेवण पित्त होऊ नये म्हणून जेवण करायच्या आधीच अँटासिड्स (Antacids) खातात. मात्र तुम्हाला माहीत आहे का ? की, हे अँटासिड्स शरीरासाठी हानिकारक असतात. अँटासिड्सच्या अति आणि अनावश्यक सेवनाने तुमची किडनी निकामी होऊ शकते. तसेच जठराचा कर्करोग देखील होऊ शकतो.

जगभरातील संशोधकांच्या सांगण्यानुसार, अँटासिड्सच्या सततच्या वापरामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. तसेच पचनसंस्थेला देखील हानी पोहोचू शकते. याशिवाय मूत्रपिंड, हृदयरोग, उच्च रक्तदाब, आतड्यांशी संबंधित गंभीर आजार आणि अन्ननलिका आणि आतड्यांचा कर्करोग यासारख्या गंभीर समस्या देखील उद्भवतात.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

अँटासिड्सच्या वापरामुळे खालील समस्या उद्भवतात

१) पचनक्रिया मंदावते : अँटासिड्सचा जास्त वापर केल्यामुळे पचनक्रिया मंदावते. तसेच अन्न पचण्यासाठी आवश्यक आम्लाची तीव्रता कमी होते. याचा परिणाम फक्त पचनक्रियेवर होत नाही तर आहारातून पोषक तत्वे शोषण्याच्या प्रक्रियेवर देखील परिणाम होतो. त्यामुळे शरीरात टॉक्सिन्स वाढू लागतात आणि आवश्यक पोषणही शोषले जाऊ शकत नाही. पचनक्रिया बरोबर नसल्यास जुलाब किंवा बद्धकोष्ठता अशा समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता तर असतेच पण नेहमी थकवा, उलट्या-मळमळ, डोके-खांदे आणि हात दुखणे, लघवीलाही त्रास होतो.

२) किडनी निकामी होते – अँटासिड्समध्ये अशी संयुगे असतात जी किडनीसाठी हानिकारक असतात. ही संयुगे दीर्घकाळ घेतल्यास किडनी निकामी होते. उदाहरणार्थ, प्रोटॉन पंप इनहिबिटर (पीपीआय) इ. काही वर्षांपूर्वी झालेल्या जागतिक अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की, “गॅस” आणि छातीत जळजळ या उपचारांसाठी पीपीआय श्रेणीतील अँटी-अ‍ॅसिडिटी औषधांचा दीर्घकाळ वापर केल्याने, किडनी खराब होण्याचा धोका किंवा इतर त्याच्याशी संबंधित कमी गंभीर समस्या, गॅस्ट्रिक कॅन्सर, कमकुवतपणा किंवा हाडे जास्त तुटणे आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या समस्यांचा धोका लक्षणीय वाढतो.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

३) ऑटोइम्यून रोग किंवा आयबीएसचा धोका : अ‍ॅस्पिरिनयुक्त अँटासिड्सच्या वापरामुळे हृदयाशी संबंधित समस्या आणि उच्च रक्तदाब वाढू शकतो. रॅनिटिडीन असलेल्या अँटासिड्सच्या वापराने कर्करोगाचा धोका देखील अनेक संशोधनांमध्ये नमूद केला आहे. अँटासिड जास्त खाल्ल्याने पोटातील आम्ल अधिक निष्क्रिय होऊन पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. यामुळे न पचलेले किंवा कमी पचलेले अन्न आतड्यांपर्यंत पोहोचले तर ते आतड्यांना नुकसान पोहोचवते. अशा परिस्थितीत ऑटोइम्यून रोग किंवा आयबीएसचा धोका देखील वाढू शकतो.

४) आतड्यांवर सूज येणे – अँटासिड्सच्या अतिसेवनामुळे पोट आणि आतड्यांमध्ये सूज आणि अल्सर, गॅस्ट्रो आणि एसोफेजियल, पोटात अल्सर, छातीत जळजळ, अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि जीईआरडी इत्यादी कमी-अधिक गंभीर समस्या उद्भवू शकतात. यामुळे अँटासिड्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Side effects of antacids

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *