मेस्सी, रोनाल्डोच्या पंक्तीत विराट

महत्वाच्या बातम्या



एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. विराट कोहली इंस्टाग्रामवर २५० दशलक्ष फॉलोअर्स पार करणारा पहिला आशियाई व्यक्ती बनला आहे. इतकेच नाही तर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर हा विक्रम करणारा विराट कोहली तिसरा खेळाडू ठरला आहे. किंग कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कोहलीचे भारतातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. विराट कोहली हे नाव फक्त भारतीय क्रिकेटशी जोडलेले नसून जगभरात प्रसिद्ध आहे. मैदानावरील अँग्री यंग मॅन विराट कोहली त्याची दमदार खेळी पॉवर हिटिंगसाठी प्रसिद्ध आहे. विराट कोहली सध्या ३४ वर्षांचा आहे. कोहलीने यंदाच्या इंडियन आयपीएलमध्ये दोन शतके ठोकली. यंदाच्या मोसमातून आरसीबी संघाचे आव्हान संपले आहे. त्यामुळे सध्या कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, कोहलीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *