HSC Result | उद्या बारावीचा निकाल लागणार ; निकाल पाहण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स !

कृषीHSC Result |दहावी व बारावीचा निकालाला विषेश महत्त्व असते. करिअरच्या दृष्टीकोनातून हे दोन्ही निकाल महत्त्वाचे असतात. दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार ? याकडे राज्यातील पालक, विद्यार्थी व शिक्षकांचे लक्ष लागले होते. मागील काही दिवसांपासून या निकालाची प्रतीक्षा सुरू आहे.

बारावीचा निकाल उद्या लागणार

दरम्यान उद्या (ता.२५) ला दुपारी ठीक दोन वाजता बारावीच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाने याबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली असून उद्या ऑनलाइन पद्धतीने हा निकाल सर्वांना पाहता येणार आहे. हा निकाल कसा पहावा याबद्दल जाणून घेऊया अधिक

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या

१) Maharesult.nic.in

२) hsc.maharesult.org.in

३) hscresult.mkcl.org

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

● वरील कोणत्याही संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जा
● याठिकाणी HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा.
● यानंतर तुमचा सीट नंबर टाका.
● त्याखाली तुमची जन्म तारीख टाका
● याठिकाणी तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
● यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

SMS द्वारे सुद्धा पहा बारावीचा निकाल

बऱ्याचदा निकाल पाहताना वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता असते. यामुळे निकाल पाहण्यात अडचणी येतात. तसेच इंटरनेटला देखील अनेकदा रेंज नसते. अशावेळी वेबसाईटवर निकाल पाहणे अडचणीचे ठरते. अशावेळी मोबाईलवरून SMS करून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

यासाठी तुमच्या मेसेज बॉक्स मध्ये कॅपिटलमध्ये MHHS असे टाईप करा. त्यापुढे तुमचा परीक्षा क्रमांक टाका आणि ५७७६६ या क्रमांकावर SMS पाठवा. यानंतर काही वेळातच तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

Follow these steps to view HSC result

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *