Shah Rukh Khan : शाहरुख खान बॉलिवूडचा सुपरस्टार बनण्यामागे ‘या’ अभिनेत्याचा आहे हात, SRK नं स्वतःच केला खुलासा – Marathi News | Shah rukh khan talk on arman kohli is responsible for making me a star drop out of deeewana latest marathi sport news

मनोरंजन



Shah Rukh Khan On Armaan Kohli : शाहरुखने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. टीव्हीपासून त्याने आपल्या करिअरला सुरुवात करत चित्रपटांमध्ये आज त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या चांगला चर्चेत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. तसंच आता शाहरुख खान सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे चाहते सलमान आणि शाहरुखची जोडी पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. तसेच शाहरुखने आत्तापर्यंत एक सौ बढकर एक चित्रपटात काम करत प्रेक्षकांच्या मनात अविस्मरणीय असे स्थान निर्माण केलं आहे.

आता त्याचे चाहते लाखोंच्या संख्येत आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरशः वेडे होतात. पण शाहरुखने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. टीव्हीपासून त्याने आपल्या करिअरला सुरुवात करत चित्रपटांमध्ये आज त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ते म्हणतात ना, एखादा व्यक्ती मोठा होण्यामागे कोणाचा ना कोणाचा सपोर्ट त्याला असतोच. अशाच प्रकारे शाहरुख खानला देखील त्याची बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण करण्यामागे एका व्यक्तीचा मोठा हात आहे. तर ही व्यक्ती कोण? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर आपण आज याच व्यक्तीबाबत जाणून घेणार आहोत.

ही व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून अरमान कोहली आहे. शाहरुखला स्टार बनवण्यामागे अरमान कोहली यांचा मोठा हात आहे. तर झालं असं की, ‘दिवाना’ चित्रपटासाठी शाहरुख खानची नाही तर अरमान कोहली यांची निवड करण्यात आली होती. त्यांनी अभिनेत्री दिव्या दत्तासोबत चित्रपटाच्या पोस्टरसाठी शूट देखील केले होते. मात्र, अचानक त्यांनी या चित्रपटात काम करण्यासाठी नकार दिला. त्यानंतर हा चित्रपट शाहरुख खानला मिळाला. या चित्रपटातून शाहरुख खाननं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सांगायचं झालं तर दिवाना चित्रपटात शाहरुखनं जरी मुख्य भूमिका साकारली नसली तरी त्यांनं आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं.

शाहरुखनं कॅमेऱ्यासमोर स्वतःच केला होता खुलासा

2016 मध्ये शाहरुख खानने यारो की बारात या कार्यक्रमात याबाबत खुलासा केला होता. तो म्हणाला की, मी आज स्टार बनण्यामागे अरमान कोहली यांचा मोठा हात आहे. ते दिवंगत अभिनेत्री दिव्यासोबत चित्रपटाच्या पोस्टरवर होते. आजही माझ्याकडे ते पोस्टर तसंच आहे. मला स्टार बनवल्याबद्दल अरमान कोहली यांचे मनापासून आभार.

शाहरुखचे सुपरहिट चित्रपट

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्याचा प्रदर्शित झालेला ‘पठाण’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. त्याच्या या चित्रपटाने जगभरात 1050 करोड रूपये एवढी कमाई केली आहे. तसंच आता शाहरुखचा ‘जवान’ आणि ‘डंकी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनाही त्याच्या या चित्रपटांबाबत उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *