दिवसेंदिवस आर्थिक आर्थिक गैरव्यवहार करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या महाभागांच्या संख्येत वाढ होत आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या यांसारखे गुन्हेगार यामध्ये आघाडीवर आहेत. दरम्यान आर्थिक गुन्हे करून पळून जाणाऱ्या गुन्हेगारांवर दबाव आणण्यासाठी केंद्र सरकारने ( central government) एक मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गुन्हेगारांसमोरील अडचणी वाढणार
केंद्र सरकारने आता आर्थिक गुन्ह्यांत अडकलेल्या व्यक्ती किंवा कंपन्या यांचा माहितीकोश म्हणजेच डेटाबेस तयार करण्याचे ठरविले आहे. यामध्ये ‘राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या’ धर्तीवर ‘राष्ट्रीय आर्थिक गुन्हे नोंद’ असा डेटाबेस (database) केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागाकडून तयार केला जाणार आहे. यामुळे आर्थिक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांसमोरील अडचणी वाढणार आहेत. (Economic Offenders)
वाचा: विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर
युनिक इकॉनॉमिक ऑफेंडर कोड
आर्थिक गुन्ह्यातील आरोपींना या डेटाबेसच्या आधारे आता बॅज क्रमांक दिले जाणार आहेत. यामध्ये आर्थिक गुन्हेगारांची ओळख एका विशिष्ट कोडद्वारे केली जाईल. आर्थिक गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्ती किंवा कंपनीसाठी सरकारकडून एक युनिक कोड जारी केला जाणार आहे. हा ओळख क्रमांक ‘युनिक इकॉनॉमिक ऑफेंडर कोड’ (Unique Economic Offender Code) म्हणून ओळखला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रत्येक आरोपीसाठी स्वतंत्र कोड असणार
ज्या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र आधार कार्ड किंवा पॅनकार्ड असते. तसेच एक विशिष्ट आधार क्रमांक व पॅन क्रमांक असतो. त्याप्रमाणे आता प्रत्येक आरोपीसाठी स्वतंत्र कोड असणार आहे. विशेष म्हणजे हा कोड गुन्हेगाराच्या आधार क्रमांकाशी किंवा कंपनीच्या पॅन कार्डशी लिंक केले जाणार आहे.
Advantages | युनिक इकॉनॉमिक ऑफेंडर कोडचा फायदा
हा कोड कंपन्या किंवा व्यक्तींच्या आधार आणि पॅनकार्ड सोबत लिंक असणार आहे. यामुळे त्यांच्यावरील आर्थिक गुन्ह्यांची सर्व प्रकरणे लिंक करणे तपास यंत्रणेला सोपे होणार आहे. याशिवाय गुन्हेगाराला पकडण्यासाठी देखील युनिक कोड वरील माहितीचा उपयोग होणार आहे.
Economic Offenders are going to expose through an unique code
हेही वाचा:
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..