Heat Stroak | सावधान ! उन्हाचा तडाखा वाढतोय, राज्यात उष्माघाताचे दोन बळी; जाणून घ्या पुढील अंदाज..

कृषीHeat stroak |दिवसेंदिवस वेगाने तापमान वाढ होत आहे. राज्यातील लोक वाढत्या तापमानाने हैराण झालेले आहेत. यामुळे उष्माघात होण्याचा धोका वाढत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १५ लोकांचा उष्माघाताने मृत्यु झाला होता. त्यानंतर आता राज्यात दोन व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यु झाला आहे.

दोन व्यक्तींचा उष्माघाताने मृत्यु

या दोन्ही व्यक्ती जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील आहेत. जळगाव मध्ये सध्या उष्णतेची लाट पसरली असून येथील तापमान 45 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. येथील अमळनेर व रावेर येथे उष्मघातामुळे ( Heat Stroak) मृत्यू झाला आहे. अमळनेर येथील रुपाली राजपूत यांचा व रावेर येथील नम्रता दिनेश चौधरी यांचा नुकताच उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे.

First case | पहिली घटना

रावेर (Raver ) येथील नम्रता चौधरी वरणगाव येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी येत होत्या. त्यावेळी त्यांना उन्हाचा तडाखा बसला. अशातच उलट्या व मळमळ झाल्यामुळे त्या घरातच बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणी करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Second Case| दुसरी घटना

दुसरीकडे अमळनेर येथील रुपाली राजपूत एका विवाह समारंभासाठी अमरावतीला गेल्या होत्या. यावेळी प्रवास करुन परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले व उलट्यांचा त्रास सुरु झाला. हा त्रास वाढताच त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करुन घेतले. मात्र, काही वेळानंतर त्यांना उलट्यांचा जास्तच त्रास होऊ लागला. यावेळी रुपाली यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र, तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तापमानाने उच्चांक गाठला आहे.

राज्यात पुण्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. तर, जळगावमध्ये काल सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची झाली नोंद झाली. पुढील तीन दिवस अशीच उष्णतेची लाट असणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यातील प्रमुख शहरात तापमानानं उच्चांक गाठला आहे. बंगाल उपसागरात मोचा चक्रीवादळ सक्रिय झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Death cases due to heat stroak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *