Palak Tiwari | आई श्वेता तिवारी हिच्यासोबत असलेल्या नात्यावर पलक तिवारीचा मोठा खुलासा, म्हणाली, कायमच दुर्लक्ष केले… – Marathi News | Palak Tiwari made a big comment on his relationship with mother Shweta Tiwari

मनोरंजन


[ad_rcc]

सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान देखील या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला .या चित्रपटाची ओपनिंग ठिक गेलीये.

मुंबई : श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा रिलीज झालेला किसी का भाई किसी की जान या चित्रपटात पलक तिवारी ही महत्वाच्या भूमिकेत आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) आणि पूजा हेगडे हे मुख्य भूमिकेत आहे. किसी का भाई किसी की जान चित्रपटाची ओपनिंग ठिक झाली. पहिल्या दिवशी फार काही धमाका करण्यात सलमान खान याच्या या चित्रपटाला यश मिळाले नाही. मात्र, शनिवारी बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ ही बघायला मिळाली. सलमान खान याच्यासोबतच चित्रपटाची संपूर्ण टिम चित्रपटाचे (Movie) जोरदार प्रमोशन करताना दिसली.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. सलमान खान याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यामध्ये क्रेझ आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सलमान खान हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. या शोमध्ये सलमान खान हा कपिल शर्मा याच्यासोबत मस्ती करताना दिसला.

श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी जोरदार चर्चेत आहे. किसी का भाई किसी की जान चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये ती व्यस्त आहे. यादरम्यान एका मुलाखतीवेळी पलक तिवारी हिने इब्राहिम अली खान आणि आर्यन खान यांच्याबद्दल मोठे विधान केले होते. इतकेच नाही तर नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये ती आई श्वेता तिवारीबद्दल मोठा खुलासा करताना दिसलीये.

पलक तिवारी म्हणाली की, मी सलमान सरांचा चित्रपट करत असल्याचे आईला कळले नसते तर तिने माझ्यावर अधिक लक्ष ठेवले असते. पण मी सलमान खानच्या चित्रपटात काम करणार असल्याचे समजल्यापासून ती मस्त आरामात आहे. मुळात म्हणजे आमचे रिलेशन हे 50-50 चे अजिबात नाहीये. हे एकतर्फी प्रेम आहे. आई मला फक्त सहन करते, कारण मी तिची मुलगी आहे.

मी आताही आईला दिवसातून साधारण 30 काॅल करते, पण ती माझ्या काॅलकडे दुर्लक्ष करते. या मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिने आपल्या आईसोबत नेमके कसे रिलेशन आहे, हे सांगितले आहे. पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सैफ अली खान याचा मुलगी इब्राहिम अली खान याला पलक तिवारी ही डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर अजूनही इब्राहिम अली खान याने काहीच भाष्य केले नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *