संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या लातूर पॅटर्नची शान प्रा.शिवराज मोटेगावकर सरांच्या RCC ची नवी ब्रँच कोल्हापूर येथे सुरू करण्यात आली आहे. नुकताच या ब्रँचचा उदघाटन सोहळा पार पडला. कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांचं भविष्य उज्वल करण्याच्या दृष्टीने RCC ने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. RCC मुळे येथील विद्यार्थ्यांचं डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचं स्वप्नं नक्कीच पूर्ण होणार.
१० वी नंतर पुढे काय करावे या संभ्रमातून विद्यार्थ्यांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी भारतातील गाजलेल्या लातूर पॅटर्नची शान आणि RCC चे सर्वेसर्वा प्रा. शिवराज मोटेगावकर सरांचे प्रेरणादायी व मार्गदर्शनपर व्याख्यान कोल्हापूर येथे नुकतेच पार पडले.
१० वी नंतर पुढे असणाऱ्या संधी, परीक्षेत चांगले यश कसे मिळवावे?अभ्यास कसा करावा? अपयश आले तर त्याचा सामना कसा करावा? स्वतःला कसे प्रोत्साहित करावे? अश्या अनेक विषयांवर मोटेगावकर सरांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. आयुष्यात यश मिळवण्यासाठी व आपलं ध्येय साध्य करण्यासाठी इच्छित असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी हे व्याख्यान महत्त्वाचे ठरले.