Sapna Chowdhary हिला फॉर्च्यूनर द्यायची आमदारची इच्छा; अभिनेत्रीची आई भडकली आणि… – MLA want to gift Fortuner car to actress and dancer Sapna Chowdhary

मनोरंजन




आमदाराने फॉर्च्यूनर द्यायची इच्छा व्यक्त केल्यानंतर भडकली सपना चौधरी हिची आई आणि म्हणाली, ‘याचा अर्थ….’, तेव्हा आईकडून अभिनेत्रीला जी शिकवण मिळाली ती अत्यंत महत्त्वाची ठरली.

मुंबई : हरियाणामधील सुप्रसिद्ध डान्सर आणि गायक सपना चौधरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. खरं तर सपना तिच्या डान्ससाठी प्रचंड प्रसिद्ध अहे. असंख्या लोक तिच्या तालावर थिरकतात. सोशल मीडियावर देखील सपनाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रचंड मेहनत करुन सपना आज याठिकाणी पोहोचली आहे. सपनाने अनेक मुलाखतींमध्ये तिची मेहनत आणि कठीण दिवसांचे किस्से सांगितले आहेत. आज सपना चौधरी हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. इन्स्टाग्रामवर सपनाचे ५.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सपना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

मुलाखतीत सपना म्हणाली, ‘मी एकदा स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला.’ एवढंच नाही अमदाराने व्यक्त केलेली इच्छा देखील अभिनेत्री मुलाखतीत सांगितली. एका आमदाराने मला फॉर्च्यूनर द्यायची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा आई प्रचंड भडकली होती. आईने नकार दिल्यानंतर मी अनेक दिवस नाराज होती.’

Sapna Choudhary 3

हे सुद्धा वाचा



पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘यूपीमधून मला एका आमदाराचा फोन आला होता. तेव्हा माझं काम आई बघायची. मी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मला फॉर्च्यूनर खूप आवडते.. तेव्हा एका आमदाराने मला फॉर्च्यूनर द्यायची इच्छा व्यक्त केली. मोफत फॉर्च्यूनर मिळणार म्हणून मी आनंदी होती’

‘मी आनंदी होती पण माझी आई भडकली. तेव्हा मला आईचा प्रचंड राग आला होता. कारण तिन फॉर्च्यूनरसाठी नकार दिला. त्यानंतर आई म्हणाली, आमदाराला फॉर्च्यूनर द्यायची आहे, याचा अर्थ तुला कळतो का?  स्वतःच्या कतृत्त्वावर चार गाड्या घराबाहेर उभ्या कर… त्या गोष्टीला किंमत असते.. मला माझ्या आईकडून खूप काही शिकायला मिळालं आहे. तिने मला तेव्हा समजावलं… ‘ असं सपना मुलाखतीत म्हणाली.

Sapna Choudhary 8

सपना चौधरी हरियाणातील सुप्रसिद्ध गायक आणि डान्सर आहे. बॉलिवूडच्या चित्रपटात तिने आयटम साँग केले आहेत. तसेच ती बिग बॉसमध्येही येऊन गेली आहे. याशिवाय ती काही चित्रपटातही दिसणार असल्याचेही सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावर देखील सपना चौधरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सपनाच्या कार्यक्रमात अनेक लोकांची गर्दी जमते. तिची एक झलक पाहण्यासाठी कायम चाहते उत्सुक असतात. सपना फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *