Video | नीता अंबानीच्या कार्यक्रमात या व्यक्तीला पाहून आर्यन खान याला आले हसू, व्हिडिओ पाहून चाहते झाले थक्क – Aryan Khan’s video of Nita Ambani’s program has gone viral

मनोरंजन


शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील आर्यन खान हा कायमच चर्चेत असतो. आर्यन खान हा लवकरच बाॅलिबूड चित्रपटांमध्ये पदार्पण करणारा आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान देखील यंदा बाॅलिवूडच्या चित्रपटात दिसणार आहे.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट (Movie) पठाण हाच ठरलाय. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडच्या (Bollywood) मोठा पडद्यावर पुनरागमन केले आहे. चाहते शाहरुख खान याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते. सुरूवातीपासूनच शाहरुख खान याच्या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत होती.

शाहरुख खान याचा लेक आर्यन खान याने अजून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले नाहीये. मात्र, लवकरच आर्यन खान आणि सुहाना खान हे बाॅलिवू़मध्ये पदार्पण करणार आहेत. शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिचा चित्रपट तर याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आर्यन खान हा जरी बाॅलिवूड चित्रपटांपासून सध्या दूर असला तरीही तो कायमच चर्चेत असतो.

नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यात बाॅलिवूड कलाकारांचा जलवा बघायला मिळाला. आता याच उद्घाटन सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान याचा लेक आर्यन खान हा दिसतोय.

कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यात शाहरुख खान हा त्याच्या पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसला. शाहरुख खान याच्या या डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. विशेष म्हणजे झुमे जो पठाण या गाण्यावर फक्त शाहरुख खान हाच नाहीतर रणवीर सिंह आणि वरूण धवन हे देखील डान्स करत होते.

शाहरुख खान हा स्टेजवर ज्यावेळी झुमे जो पठाण या गाण्यावर डान्स करत होता, त्यावेळी आर्यन खान हा हसताना दिसला. आता यावरच जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत आर्यन खान याला हसायला नेमके काय झाले हा प्रश्न विचारला आहे. शाहरुख खान याच्या डान्सपेक्षाही अधिक आर्यन खान याच्या हसण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *