प्रियांकाची ही मुलाखत जगभरात व्हायरल झाली. त्यावर बॉलिवूडमधील कलाकारांकडूनही विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. गायक अमाल मलिक, अभिनेते शेखर सुमन, कंगना रणौत यांनी प्रियांकाच्या वक्तव्याला दुजोरा दिला आणि इंडस्ट्रीविषयी आणखी खुलासे केले.

Priyanka Chopra
Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत प्रियांकाने बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत मोठा खुलासा केला. बॉलिवूडमध्ये मला कोपऱ्यात ढकलण्यात आलं होतं, म्हणूनच मी हॉलिवूडकडे वळले, असं ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यावर बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत तिला पाठिंबा दिला. मात्र याबाबत ती इतक्या वर्षांनंतर का व्यक्त झाली, असा प्रश्न अनेकांना पडला. प्रियांका लवकरच ‘सिटाडेल’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच सीरिजच्या प्रमोशनदरम्यान तिने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.