Kumar Sanu | कुमार सानू यांची मुलगी करणार बाॅलिवूडमध्ये डेब्यू, या चित्रपटाच्या माध्यमातून – Kumar Sanu’s daughter shannon Sanu will make her Bollywood debut

मनोरंजन


कुमार सानू यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे कुमार सानू यांचा चाहता वर्गही मोठा आहे. काही दिवसांपूर्वी कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू हा बिग बाॅसमध्ये सहभागी झाला होता. यावेळी जान कुमार सानू याने काही धक्कादायक खुलासे केले होते.

मुंबई : बाॅलिवूडचे प्रसिध्द गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांनी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे कुमार सानू यांचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. खास गोष्ट म्हणजे मोठ्या आनंदाने प्रेक्षक कुमार सानू यांचे गाणे ऐकताना दिसतात. नुकताच कुमार कुमार सानू यांनी त्यांच्या करिअरचे 35 वर्ष पुर्ण केले आहेत. कुमार सानू यांनी काही दिवसांपूर्वीच सध्याच्या गायकांबद्दल अत्यंत मोठे आणि धक्कादायक विधान (Shocking statement) केले होते. कुमार सानू थेट म्हणाले होते की, मी पूर्वीचीच जुनी गाणे ऐकतो. आताची गाणी ऐकायला मला अजिबातच आवडत नाही. कुमार सानू यांचे हे विधान ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला होता.

आता कुमार सानू हे परत एकदा चर्चेत आले आहेत. कुमार सानू यांची मुलगी बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे. शैनन सानू ही कुमार सानू यांची मुलगी आहे. शैनन सानू ही चल जिंदगी या चित्रपटामध्ये डेब्यू करत आहे. चल जिंदगी हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. शैनन सानू हिच्या अभिनयाकडे सर्वांच्या नजरा आहेत.

चल जिंदगी या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झालाय. हा चित्रपट मित्रांच्या सुंदर मैत्रीवर आधारित असल्याचे सांगितले जातंय. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये विवेक दहिया आणि संजय मिश्रा जबरदस्त लूकमध्ये दिसत आहेत. विवेक दहिया, संजय मिश्रा, मीता वशिष्ठ, विवान शर्मा आणि विक्रम सिंह हे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत.

आता कुमार सानू यांच्या मुलीचा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याने काही दिवसांपूर्वीच मोठे धक्कादायक विधान केले. जान कुमार सानू हा कायमच आपले वडील कुमार सानू यांच्यावर आरोप करतो. इतकेच नाहीतर त्याने बिग बाॅसच्या घरात आपले आणि वडिलांचे नाते कसे आहे हे सांगितले.

जान कुमार सानू म्हणाला की, मी सहा महिन्याचाच असताना माझे वडील मला आणि माझ्या आईला सोडून गेले होते. माझ्या लहानपणीच्या वडिलांसोबतच्या काही आठवणी नाहीत. इतकेच नाहीतर मला काही वर्ष हे देखील माहित नव्हते की, माझे वडील नेमके कोण आहेत. ज्यावेळी मला माझ्या वडिलांबद्दल कळाले, तेंव्हा माझ्यासाठी या गोष्टी थोड्या अवघड नक्कीच होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *