Crop Loan| ‘या’ जिल्ह्यांमध्ये पीक कर्ज वाटपास झाली सुरुवात, तुमच्या जिल्ह्यात कधीपासून? जाणून घ्या सविस्तर…

कृषी


Crop Loan| नव्या हंगामास सुरुवात होणं म्हणजे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढणं. मोठ्या शेतकऱ्यांसाठी हा भार जरी हलका असला तरी लहान शेतकऱ्यांसाठी हा भार खूपच जड असतो. मशागतीची कामं, बी-बियाणे, कीटकनाशके इत्यादींसाठी बराच पैसा खर्च करावा लागतो. अशावेळी शेतकऱ्यांचा भार हलका करण्यासाठी मदतीला येतं ते पीक कर्ज (Crop loan). पीक कर्जामुळे शेतकऱ्यांना खूपच मदत झाली आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाची सुरुवात कधी होणार याची शेतकरी दरवर्षी आतुरतेने वाट बघत असतात. 2021 पासून पीक कर्ज बिनव्याजी करण्यात आलं आहे. त्यामुळे कायमच अडचणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

वाचा: लूट थांबणार? दूध संकलन केंद्रांना लगाम, राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

कुणाकडून मिळतं पीक कर्ज

पीक कर्जाच वाटप हे खाजगी बँका, सरकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत केलं जातं. 3 लाखांपर्यंत मिळणारं हे पीक कर्ज बिनव्याजी असतं. त्यासाठी जिल्हा नियोजन आढावा बैठकीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक कर्जाचं उद्दिष्ट ठरवण्यात येतं. शेतकऱ्यांना सर्वात जास्त पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जातं ते जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून. ज्या जिल्ह्यातील मध्यवर्ती बँका सशक्त आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केलं जातं. मात्र ज्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका कमकुवत आहेत त्या जिल्ह्यात शेतकरी खाजगी आणि सरकारी बँकांकडे वळलेले दिसतात.

यांना मिळणार नाही पीक कर्ज

जर तुम्ही अगोदर घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड केली नसेल तर तुम्हाला दुसरे पीक कर्ज घेता येणार नाही. त्यामुळे पीक कर्जाची परतफेड करणं आवश्यक आहे. तसंच ज्यांची खाती एनपीएत (NPA) गेलेली आहेत त्यांनाही पीक कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते.

या जिल्ह्यात कर्ज वाटप सुरू

पीक कर्जाचे वाटप करण्यात आघाडी घेतली आहे ती नाशिक जिल्ह्यानं. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने 1 एप्रिल पासून पीक कर्ज वाटपास सुरुवात केली आहे. धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात 5 एप्रिल पासून पीक कर्ज वाटपाला सुरुवात होणार आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये 15 एप्रिल पासून या पीक कर्ज वाटपाला सुरुवात होणार आहे.

वाचा: हर्षोल्हास! कापूस वधारला, शेतकरी आनंदला दरात झाली ‘इतकी’ वाढ शेतकरी संघटनेची ‘ही’ नाराजी

ऑनलाइन कर्ज वाटपाची शक्यता

ऑफलाईन पीक कर्ज मंजूर करताना शेतकऱ्यांना बरेच अडथळे येतात. त्यांची अडवणूक केली जाते. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. दलाल तर असतातच. या गोष्टींकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात बच्चू कडूंनी लक्ष वेधले होते. यामुळे ही पद्धत आता ऑनलाईन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *