Corona Alert| कोरोना म्हटलं की आठवतं ते लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing), सॅनिटायझर्स, मास्क्स आणि कोरोनामुळे झालेले मृत्यू. गंगा नदीतून वाहणारी प्रेतं. जगाला हादरवून सोडणारा असा हा डोळ्यांना न दिसणारा व्हायरस (Virus). लशीच्या शोधामुळे याचा नायनाट होईल असं सगळ्यांनाच वाटलं होतं. पण नाही. कोरोनानं पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. देशभरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. महाराष्ट्रातही गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. याला कारण आहे XBB 1.16 हा नवीन कोरोना व्हेरिएंट (Variant).
वाचा: लूट थांबणार? दूध संकलन केंद्रांना लगाम, राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
या जिल्ह्यात आहे सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट
ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या अधिक आहे त्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. सर्वात जास्त पॉझिटिव्हिटी रेट आहे तो सोलापूर जिल्ह्याचा. 22.8 इतका. यानंतर सिंधुदुर्ग 15.8%, पुणे 13.2%, सांगली 13.1%, कोल्हापूर 11.1% आणि सातारा 11%. तसेच सक्रिय रुग्णांमध्ये वाढ होणाऱ्या जिल्ह्यात ठाणे, पुणे, रायगड, मुंबई, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र कोरोना बाधितांचा मृत्यू दर 1.8% आणि रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण 98.12% इतकं असल्यामुळे सध्या महाराष्ट्राला घाबरण्याचं कारण नाही.
या जिल्ह्यात मास्क सक्ती
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढत आहे. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी मास्क सक्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. मात्र राज्य सरकारकडून अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. तसेच गर्दीची ठिकाणं टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
वाचा: हर्षोल्हास! कापूस वधारला, शेतकरी आनंदला दरात झाली ‘इतकी’ वाढ शेतकरी संघटनेची ‘ही’ नाराजी
आरोग्य यंत्रणा सतर्क
या रुग्णवाढीच्या प्रमाणामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. रुग्णांच्या उपचारासाठी गरजेची उपकरणे, औषधं, ऑक्सिजनचा साठा, बेड्स आणि कोरोना प्रतिबंधित लसींचा साठा वाढवण्यात आला आहे. तसेच पुणे, नागपूर आणि मुंबई या विमानतळांवर कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे महाराष्ट्र शासनाची आरोग्य यंत्रणा याबाबतीत युद्ध पातळीवर काम करत असल्याचे दिसून येत आहे. मॉकड्रीलच्या अहवालानुसार महाराष्ट्रात सध्या 1 हजार 589 कोविड रुग्णालये, 51 हजार आयसोलेशन बेड्स, 9 हजार 250 व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनचेही हजारो सिलेंडर्स उपलब्ध आहेत.
हेही वाचा:
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..