Amitabh bachchan मृत्यूशी झुंज देत असताना जया बच्चन यांनी रेखा यांना अशी घातली होती बंदी – rekha want to meet Amitabh bachchan when Big B battling for life in icu

मनोरंजन



रेखा यांना भेटता येऊ नये म्हणून सगळं काही केलं, पण तरी रेखा या रुग्णालयात धडकल्याच आणि…, रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याची चर्चा आजही तुफान रंगलेली असते.

मुंबई : बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक लव्हस्टोरी चर्चेत राहिल्या, पण अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांची लव्हस्टोरी आजही चर्चेत असते. रेखा यांनी अनेकदा बिग बींवर असलेलं प्रमे सर्वांसमोर व्यक्त केलं. पण ही लव्हस्टोरी शेवटपर्यंत अधूरी राहिली. फक्त रिल लाईफमध्येच नाही तर, रियल लाईफमध्ये देखील रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण एक प्रसंग असा आला जेव्हा अमिताभ बच्चन रुग्णालयात होते आणि रेखा यांना बिग बींना भेटता येवू नये म्हणून जया यांनी बंदोबस्त केला होता. पण तरी देखील मोठं धाडस करून रेखा रुग्णालयात पोहोचल्या आणि मृत्यूशी झुंज देत असलेल्या अमिताभ बच्चन यांना भेटल्या.

२६ जूलै १९८२ साली अमिताभ बच्चन ‘कुली’ सिनेमाची शुटिंग करत होते. पण सिनेमात ॲक्शन सीन शुट करताना बिग बींचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर बिग बींची प्रकृती गंभीर होती. एक एक क्षण त्यांच्यासाठी आणि कुटुंबासाठी महत्त्वाचा होता. अपघात झाल्यानंतर बिग बीयांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा



रुग्णालयात असलेल्या बिग बींच्या गळ्यातून एक ट्यूब टाकली होती आणि मशीनच्या माध्यमातून अमिताभ बच्चन श्वास घेत होते. तेव्हा बिग बींची प्रकृती गंभीर होती. प्रत्येक जण त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होता. मृत्यूशी झुंज देत असलेल्या अमिताभ बच्चन यांची प्रकृती सुधारण्यासाठी जया बच्चन सिद्धिविनायक मंदिर, माहिम चर्च आणि हाजी आली याठिकाणी प्रार्थना करायला जायच्या.

रुग्णालयातून कायम अमिताभ बच्चन याच्या आरोग्यावर हेल्थ बुलेटीन जारी करण्यात येत असे. अमिताभ बच्चन यांनी विचारणा करण्यासाठी इंदिरा गांधी देखील रुग्णालयात पोहोचल्या होत्या. अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच राजीव गांधी देखील अमेरिकेतून भारतात आले.

रुग्णालयात अनेक जण बिग बींना भेटण्यासाठी येत होते. पण रेखा यांना रुग्णालयात येण्यासाठी परवानगी नव्हती. रिपोर्टनुसार, रेखा यांना भेटता येऊ नये म्हणून जया यांनी खूप काही केलं. पण त्याचा काही फायदा झाला नाही. अखेर अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी रेखा रुग्णालयात धडकल्या.

एका मासिकातील रिपोर्टनुसार, रेखा मेकअप न करता आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसून रुग्णालयात पोहोचल्या. आयसीयूच्या दरवाजात उभं राहून त्या बिग बींकडे एकटक पाहत राहिल्या. रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *