Agriculture Electricity| उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठा चटका! कृषी पंपाच्या विजेसाठी मोजावी लागणार ‘इतकी’ वाढीव रक्कम

कृषी


Agriculture Electricity |उन्हाळ्यात पिकं खूप तहानलेली असतात. त्यांची तहान जर वेळीच भागली नाही तर ती बिचारी करपून जातात. असं होऊ नये म्हणून शेतकरी विहिरी, शेततळी, तलाव, कालवे यांमार्फत पिकांना पाणी देत असतो. हे पाणी पिकांपर्यंत पोहोचण्यासाठी लागतात कृषी पंप आणि कृषी पंपासाठी आवश्यक असते वीज. वीज नाही अशी फार कमी ठिकाणं आहेत. पण वीज असूनही ती खूपच महाग असेल तर? हो, वीज आता महागणार आहे. महावितरणने (Mahavitran) पुढील दोन वर्षांसाठी वीज दरात वाढ केली आहे. उच्चदाब आणि लघुदाब कृषी पंपांसाठी प्रति युनिट 4 रुपये 17 पैसे ते 8 रुपये 59 पैसे इतकी वाढ केली आहे. अशी माहिती राज्य वीज नियामक आयोगाने दिली.

वाचा: बाप रे! मगरीच्या तोंडात जाऊनही माणूस जिवंत, तुम्हीच पाहा विश्वास न बसणारा व्हिडिओ

अशी आहे दरवाढ

आत्तापर्यंत लघुदाब कृषी पंपासाठी स्थिर आणि मागणी दर 43 रुपये होता. तो आता 2023-24 मध्ये 47 रुपये तर 2024-25 मध्ये 52 रुपये असणार आहे. लघुदाब कृषी पंपासाठी सध्या प्रति युनिट 3 रुपये 30 पैसे असणारा दर आता 2023- 24 साठी 4 रुपये 17 पैसे तर 2024- 25 साठी 4 रुपये 56 पैसे प्रति युनिट करण्यात आला आहे. तसेच उच्चदाब कृषी पंपासाठीच्या दरातही वाढ झाली आहे. 2023-24 साली यासाठी 5 रुपये 96 पैसे आकारण्यात येणार आहेत. तर 2024-25 मध्ये 6 रुपये 38 पैसे आकारण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उन्हासोबत वीजरवाढीचाही चटका लागणार आहे.

कृषी वीजदरातच खूप वाढ

महावितरणने केलेली दरवाढ ही इतर क्षेत्रात केलेल्या वीज दर वाढीपेक्षा कृषी क्षेत्रातच जास्त आहे. उच्च दाब कृषी पंपाची प्रतियुनिट दरवाढ ही तब्बल 38.21 टक्के आहे तर लघुदाब कृषी पंपासाठी ही वाढ 38.18 टक्के आहे. या दरवाढीमुळे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर आले आहे. मात्र या दरवाढीतून महावितरणला 39 हजार 567 कोटी रुपये इतका महसूल मिळणार आहे. त्यामुळे महावितरण जोमात आणि शेतकरी कोमात असं म्हणण्यावाचून पर्याय उरत नाही.

वाचाही’ अट रद्द करा अन्यथा… कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी, अनुदानाच्या लाभात येताहेत अडचणी

का घेतला असा निर्णय

महावितरणच नव्हे तर राज्यातील इतर वीज कंपन्या म्हणजे बेस्ट, टाटा आणि अदानी यांनी सुद्धा वीज दरवाढ केली आहे. कशासाठी? तर महसुली तूट भरून काढण्यासाठी. महावितरणची महसुली तूट 67 हजार 643 कोटी रुपये इतकी प्रचंड आहे यात राज्य वीज नियामक आयोगाने 39 हजार 537 कोटींची वाढ मंजूर केली आहे. याचा फटका सबंध वीज ग्राहकांना बसणार आहे.

भर उन्हाळ्यात केलेली ही दरवाढ उन्हासारखीच चटका देणार हे मात्र नक्की!

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *