करीना कपूरचा ‘व्हॉट वुमेन वाँट’ हा टॉक शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये सैफ अली खानची आई आणि करीनाची सासू शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली. करीनाने त्यांना खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी बरेच प्रश्न विचारले.

Kareena Kapoor and Sharmila Tagore
Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेत्री शर्मिला टागोर सध्या त्यांच्या ‘गुलमोहर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं आहे. गुलमोहर चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी सून करीना कपूरच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये दोघींनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. करीनाने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरं दिली. यावेळी तिने मुलगी आणि सून यांच्यात काय फरक असतो, असाही प्रश्न विचारला होता. त्यावर शर्मिला टागोर यांनी दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.