विवेक ओबेरॉयने 1 एप्रिल 2003 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सलमान खानविरोधात गंभीर आरोप केले होते. सलमानने त्याला फोन करून धमकी दिल्याचा खुलासा त्याने केला होता. त्यावेळी विवेक अभिनेत्री ऐश्वर्या रायला डेट करत होता.

Image Credit source: Instagram
मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयने 1 एप्रिल 2003 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. या पत्रकार परिषदेत त्याने फिल्म इंडस्ट्रीच्या कटू सत्यावर प्रकाश टाकला होता. आता 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमधल्या लॉबिंग आणि धमकावण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. बॉलिवूडमध्ये मला एका कोपऱ्यात ढकलण्यात आलं होतं, म्हणूनच मी अमेरिकेला गेले, असा खुलासा प्रियांकाने तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. आता विवेक ओबेरॉयसुद्धा बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. “या कठीण परीक्षेतून मी पुढे आलो आणि वाचलो. पण प्रत्येकजण इतका नशिबवान नसतो”, असं तो म्हणाला.