एका महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर भन्नाट रील बनवल्यामुळे नागराज मंजुळे तुफान चर्चेत; सध्या सर्वत्र मंजुळे यांच्या व्हिडीओचीच चर्चा…
मुंबई : ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ अशा अनेक सिनेमांचं दिग्दर्शन करुन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी स्वतःची एक नवी ओळख तयार केली आहे. नागराज मंजुळे कायम त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण आता एक वेगळ्या कारणामुळे नागराज मंजुळे चर्चेत आले आहेत. सध्या नागराज मंजुळे ‘घर बंदुक बिरयानी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान नागराज मंजुळे यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याबरोबर भन्नाट रील बनवला आहे. सध्या त्याचा रील सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी नागराज मंजुळे यांच्या रीलवर कमेंट आणि लाईक्सा वर्षाव केला आहे.
नागराज मंजुळे यांनी पीएसआय पल्लवी जाधव यांच्याबरोबर तयार केलेला रील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘घर बंदुक बिरयानी’ सिनेमातील ‘हान की बडीव’ या गाण्यावर नागराज मंजुळे यांनी व्हिडीओ बनवला आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त नागराज मंजुळे यांनी तयार केलेल्या व्हिडीओची चर्चा आहे.
पल्लवी जाधव यांच्याबरोबर व्हिडीओ बनवत असताना नागराज मंजुळे पोलिसांची काठी उडवून, गोल फिरवताना दिसत आहेत. व्हिडीओ फक्त नागराज मंजुळे यांनी नाही तर, पल्लवी जाधव यांनी देखील त्याच्या सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत जाधव यांनी कॅप्शनमध्ये ‘तुफानी मामला… ‘घर बंदूक बिरयाणी” नागराज सर यांचा नवीन चित्रपट येतोय, ७ एप्रिल पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.’ सध्या सर्वत्र नागराज मंजुळे आणि पल्लवी जाधव यांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
‘घर बंदुक बिरयानी’ सिनेमात आकाश ठोसर, सयाजी शिंदे व सायली पाटील मुख्य भूमिकेत चाहत्यांच्या भेटील येणार आहेत. सिनेमात नागराज मंजुळे यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन हेमंत अवताडे यांनी केलं आहे. ‘घर बंदुक बिरयानी’ सिनेमा येत्या ७ एप्रिलला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
नागराज मंजुळे यांच्यासोबत व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पल्लवी जाधव दबंग महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. पल्लवी जाधव यांना मॉडेलिंगची देखील आवड आहे. त्यांनी २०२० साली जयपूर येथे पार पडलेल्या ‘मिस ग्लॅमन इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेत रनर अप ठरल्या होत्या. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्राम त्याचं १.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.